
सातारा शहर परिसरात पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Crime News : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ तर मुलीचा विनयभंग करुन धमकी; 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा : साताऱ्यात एकीकडं विवाहितेचा छळ तर दुसरीकडं मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात (Satara Police) गुन्हा दाखल झाला आहे.
पती सागर, सासरे दुर्योधन यांच्यासह पाच महिलांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सोनाली सागर शिंदे (रा. कोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०१९ ते मे २०२३ या कालावधीत सासरच्या मंडळींनी जाचहाट केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
मुलीच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा
तर, दुसरीकडं सातारा शहर परिसरात पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुश्रीत सावंत, फरीद शेख, सूरज पवार अशी त्यांची नावे आहेत. याबाबत संबंधित मुलीने फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत संशयितांनी दुचाकीवरून पाठलाग करून 'तू भेटायला का येत नाही,' असे म्हणून दमदाटी व विनयभंग केल्याचे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.