चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला!

दिलीपकुमार चिंचकर
Friday, 30 October 2020

दरवर्षी कोजागरी पौर्णिमा नागरिक उत्साहात करतात. एकत्र येवून कोजागरीचा आनंद लुटतात. अनेक नागरिक यवतेश्‍वर, कास पठारावर कोजागरीच्या मैफली आयोजित करत असत. चंद्राच्या मंद प्रकाशात, हवेच्या थंड झुळका अंगावर घेत चटकदार भेळ, पावभाजी अशा पदार्थांबरोबरच केशर युक्त मसाले दुधाचा चंद्राच्या मंद प्रकाशात कोजागरी साजरी करतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे कोठे निसर्गाच्या सानिध्यात, कॉलन्यांमध्ये एकत्र येत नागरिकांनी कोजागरी न करता घरातच कोजागरीचा आनंद लुटला.

सातारा : चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला.. चंद्र आहे साक्षीला!, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात.. अशा कविता आणि गीतातील पक्ती चांदण्यांच्या साक्षीने गात आज कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, आज नागरिकांनी कोणीही एकत्र येत उत्सव साजरा न करता चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात घरच्या घरी मैफल रंगविल्या. 

दरवर्षी कोजागरी पौर्णिमा नागरिक उत्साहात करतात. एकत्र येवून कोजागरीचा आनंद लुटतात. अनेक नागरिक यवतेश्‍वर, कास पठारावर कोजागरीच्या मैफली आयोजित करत असत. चंद्राच्या मंद प्रकाशात, हवेच्या थंड झुळका अंगावर घेत चटकदार भेळ, पावभाजी अशा पदार्थांबरोबरच केशर युक्त मसाले दुधाचा चंद्राच्या मंद प्रकाशात कोजागरी साजरी करतात, तर काही नागरिक बंगले, घरांच्या टेरेसवर कोजागरीचा बेत करत. यावेळी गाणी, चारोळ्या, कविता आणि चुटक्‍यांच्या मैफली रंगतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे कोठे निसर्गाच्या सानिध्यात, कॉलन्यांमध्ये एकत्र येत नागरिकांनी कोजागरी न करता घरातच कोजागरीचा आनंद लुटला. 

मेरुलिंग पठारावर पसरलाय फुलांचा गालिचा; पर्यटक प्रफुल्लित

कोजागरीमुळे आज दुधाची मागणी दुपट्टीने वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. सातारा शहरात सातारा दुध संघासह सकस, गोविंद आणि अनेक छोट्या मोठ्या दुध संघांचे हजारो लिटर दुध विकले जाते. येथील दुध विक्री केंद्रातून सकाळी तसेच सायंकाळी नागरिकांची बऱ्या पैकी वर्दळ वाढली होती. तसेच विविध कंपन्यांच्या दुध मसाल्यांनाही मागणी वाढली होती. तीस रुपयाला 25 ग्रॅम मसाल्याचे पाकीट विकले जात होते. घरगुती पद्धतीने केलेले दुध मसालेही आज येथे विक्रीस आले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebration Of Kojagari Pournima In Satara City Satara News