धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; भाजप राज्यभर उठाव करणार

जगन्नाथ माळी
Thursday, 14 January 2021

ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात. त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो असेही पाटील यांनी नमूद केले.

उंडाळे (जि. सातारा) : ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात. त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. त्यामुळे झालेले आरोप पाहता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.
 
माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनासाठी ते येथे बुधवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महेशबाबा जाधव उपस्थित होते.

सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?

श्री. पाटील म्हणाले, ""भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेतर्फे नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यापुढेही ती लावून धरली जाईल. त्यात भाजपचे प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील. ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात. त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. गेंड्याच्या कातडीचे मंत्री व सरकार त्याबाबत आत्मपरीक्षण करतील का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुंडे हे राजीनामा देतील, असे वाटत नाही. त्यांनी पदाचा राजीनामा तातडीने द्यावा, अशी मागणी राहील. त्यासाठी भाजपतर्फे राज्यभर उठाव करण्यात येईल.''
 

Edited By : Siddharth Latkar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Demands Dhananjay Munde Resignation satara marathi news