रिक्षाच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

हजारमाची येथील सदाशिवगडच्या पायथ्याला दुर्घटना घडली
Sai kamble
Sai kambleSakal
Updated on

कऱ्हाड - मालवाहू रिक्षाच्या धडकेत सहा वर्षांचा चिमुकला ठार झाला. हजारमाची येथील सदाशिवगडच्या पायथ्याला सायंकाळी सहाच्या सुमारास दुर्घटना घडली. पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. साई सागर कांबळे (वय सहा, रा. हजारमाची) असे चिमुरड्याचे नाव आहे. मुसा इस्माईल सय्यद (रा. ओगलेवाडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आज सायंकाळी सहाच्या सुमारास हजारमाचीच्या हद्दीत सदाशिवगड पायथ्याजवळ मालवाहू रिक्षा निघाली होती. त्यावेळी त्यावरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे चालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवली. त्यावेळी तेथे खेळणाऱ्या चिमुरड्या साईला रिक्षाची जोरदार धडक दिली. त्यात साईचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली आहे. पोलिसांनी रिक्षाचालक मुसा सय्यद याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतची फिर्याद विनोद वीरकायदे यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास प्रशांत जाधव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com