esakal | अमेरिकेत भारताच्या सुपुत्रांची हवा! नासात 'हवामान' अभ्यासासाठी आर्य, शिवराजची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेत भारताच्या सुपुत्रांची हवा! नासात 'हवामान' अभ्यासासाठी आर्य, शिवराजची निवड

सध्या हवेत वाढणाऱ्या कार्बन डायऑक्‍साईडमुळे माणसांना स्वच्छ हवा मिळत नाही. त्यामुळे अनेक आजार होतात. त्या संबंधीच्या समस्या व उपाययोजनांसंबंधी शोधनिबंध जोशी व यादव यांनी "नासा'ला ऑनलाइन नुकताच सादर केला. "नासा'ने जगातील हजारो स्पर्धकांमधून त्यांची भारतातील सात "टीम'मध्ये निवड केली आहे.

अमेरिकेत भारताच्या सुपुत्रांची हवा! नासात 'हवामान' अभ्यासासाठी आर्य, शिवराजची निवड

sakal_logo
By
मुकुंद भट

ओगलेवाडी  (जि. सातारा) : जगातील बदलत्या वातावरणातील हवामानाची समस्या व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचा अभ्यास व संशोधन आम्ही "नासा'च्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी लागणारे प्राथमिक ज्ञान मिळवण्याचा आमचा मानस असल्याचे बाल शास्त्रज्ञ आर्य गिरीश जोशी व शिवराज हिंदुराव यादव यांनी सांगितले. 

सध्या हवेत वाढणाऱ्या कार्बन डायऑक्‍साईडमुळे माणसांना स्वच्छ हवा मिळत नाही. त्यामुळे अनेक आजार होतात. त्या संबंधीच्या समस्या व उपाययोजनांसंबंधी शोधनिबंध जोशी व यादव यांनी "नासा'ला ऑनलाइन नुकताच सादर केला. "नासा'ने जगातील हजारो स्पर्धकांमधून त्यांची भारतातील सात "टीम'मध्ये निवड केली आहे. जागतिक पातळीवर त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल "नासा'ने त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. त्यानिमित्त त्यांनी "सकाळ'शी संवाद साधून स्पर्धेची माहिती दिली. जोशी (वय 15) हा श्री गजानन हाउसिंग सोसायटी व यादव हा वाखाण भाग कऱ्हाड येथे राहतो. दोघेही शिक्षण मंडळ कऱ्हाडच्या एसएमएस शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, मुख्याध्यापिका वृषाली पागे, विज्ञान शिक्षिका संध्या परांजपे, आई-वडिलांनी आजोबांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

पांगारेत रुबाबदार केवड्याच्या टोप्यांची क्रेझ; जाधव कुटुंबीयांचा अनोखा फंडा 

जोशी व यादव म्हणाले, "सध्या कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण हवेत वाढत आहे. त्यास आटोक्‍यात आणण्यास उद्योग, सामाजिक संस्था व लोकांनी परिसरात कमीतकमी 100 झाडे लावली पाहिजेत. सोलर प्लांट व पवनचक्की जरूर उभारावेत, तसेच लोकांनी कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास कार्बन डायऑक्‍साइडची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. लोकांनी इंधनावरील वाहने वापरण्याऐवजी सायकलींचा जास्तीतजास्त वापर करावा. "नासा'च्या नॉलेज चॅलेंजिंग जागतिक स्पर्धेचा अनुभव फारच चांगला व आव्हानात्मक होता. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली व आत्मविश्वास निर्माण केला. जगातील सध्याच्या विविध समस्यांची माहिती सुद्धा मिळाली.'' 

व्वा! क्या बात है.. नेता हो तो ऐसा; रोहित पवारांच्या मदतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

नासा इंटरनॅशनल स्पेस अँड चॅलेंजर स्पर्धेत भारतातील हजारो स्पर्धकांची निवड झाली आणि सहभागाचे गौरव प्रमाणपत्र दिल्याने आमच्या भावी जीवनात प्रेरणा व बळ आणि ऊर्जा मिळाली. 
- आर्य जोशी व शिवराज यादव 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top