जेथे वेचायची फुले तिथे वेचाव्या लागतायत काचा; 'कास'ला अस्वछेतेचे ग्रहण

जेथे वेचायची फुले तिथे वेचाव्या लागतायत काचा; 'कास'ला अस्वछेतेचे ग्रहण

सातारा : कास तलाव परिसरात पुन्हा मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास कच-यांच्या दुर्गंधीमुळे घुटमळू लागला आहे. कास परिसर आणि तलावाच्या स्वच्छतेची पुन्हा एकदा गरज निर्माण झालेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने पर्यावरणप्रेमींत तीव्र नाराजी पसरली आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर कास तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून सातारा शहरास पाणीपूरवठा केला जाताे. या ठिकाणी माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी शेकडाे पर्यटक येत असतात. मात्र सध्या या कास तलावासह परिसरात मोठया प्रमाणावरील काचा आढळून येऊ लागल्या आहेत.

शरद पवार सत्तेत नाहीत; महाविकास आघाडी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी 

कास परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. या परिसरात काचा, दारुच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळयांचे ढीग साचले आहे. ठिकठिकाणी चुली मांडून धुराचे लोटच्या लोट व तेथीलच परिसरातील सरपण गोळा करून हवेच्या प्रदुषणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. दरम्यान शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी तर येथे पर्यटक येताहेत परंतु वाहनातील कर्णकर्कश संगीतावर थिरकणा-या तरूणाईला येथे कचरा टाकून जाणे एवढचं माहित आहे की काय असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. .

कास तलाव परिसरातील या कचऱ्यांमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे भविष्यात जणू काही कास तलाव काच तलाव म्हणून ओळखला जाऊ नये, यासाठी पर्यटनास आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी आपली मानसिकता बदलून स्वच्छ कास राहावा यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. पाण्यात जलविहार करणे, पार्ट्यांची तेलकट भांडी , साबण अथवा पावडरने धुणे, काठावर वाहन लावून धुणे यामुळे पाणी दुषित होण्याचा संभव अधिक असून तेल, साबणाचा फेस, ऑईल यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उदभवण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात उद्या फुटणार आंदाेलनाचा फटाका! विक्रेते आक्रमक

या परिसरात पर्यटनास बंदी होती. आता पर्यटन खूले झाले असून कास तलावावर बहुसंख्य पर्यटक गर्दी करत आहेत; वाढत्या अस्वच्छतेने पर्यावरणप्रेमीतून नाराजीचे सुर उमटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com