महाबळेश्‍वर, पाचगणी गारठले; पर्यटकांची मांदियाळी सुरुच 

महाबळेश्‍वर, पाचगणी गारठले; पर्यटकांची मांदियाळी सुरुच 

भिलार (जि. सातारा) : पाचगणी व महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. दोन्ही गिरिस्थाने गारठली असून, पाचगणीत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. आज सकाळपासूनच येथे 12 ते 15 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
 
सकाळपासूनच जोरदार गार वारे वाहत होते. ढगाळ वातावरण असल्याने सकाळपासून सूर्यदर्शन झालेच नाही. थंड वाऱ्याच्या प्रवाहाने सर्व जीवनमान गारठून गेले होते. अंगाला हुडहुडी भरणारी थंडी यामुळे पर्यटननगरी अगदी गारठून गेली होती. ग्रामीण भागात रोज असणारे तापमान 28 अंश सेल्सिअस वरून 20 - 21 वर आले होते. सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर दिसत होती. सारेच जण अंगाला झोंबणारा थंडीपासून बचावासाठी प्रत्येक जण स्वेटर, टोप्या, सुती कपडे, मफलर, शाल गुंडाळून होते.

दुपारच्या तीनलाही भरतेय हुडहुडी; शेकाेट्या पेटल्या, कानटाेप्या चढल्या
 
पाचगणीत पर्यटकांची गर्दी झाली असून, थंडीमुळे बरेच पर्यटक नियमित स्ट्रॉबेरी जाम खरेदीबरोबरच थंडीपासून बचावासाठी असणारी स्वेटर, सूती टोप्या, कान टोप्या, मफलर शाल खरेदी करताना दिसत आहेत. गरमा गरम चहा, मक्‍याची तवावर भाजलेली कणसे, गरम चणे खाण्यात पर्यटक दिसत आहेत. काही नागरिक शेकोट्या पुढे बसून शेकत थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com