esakal | बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे

शेती पाण्यासाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेऊन ते काम करत होते.

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : (कै.) ऍड. बाळासाहेब बागवान यांनी खंडाळा तालुक्‍याचा शाश्वस विकासाचे ध्येय ठेऊन सर्वधर्मसमभाव जोपासत गोरगरीब, कष्टकरी जनता व शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी सांगितले. 

खंडाळा तालुक्‍यातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने येथे आयोजित शोकसभेत रामराजे बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, नितीन भरगुडे, आनंदराव शेळके-पाटील, मनोज पवार, प्रा. एस. वाय. पवार, चंद्रकांत ढमाळ, रवींद्र डोईफोडे, शैलजा खरात, वंदनाताई धायगुडे-पाटील, प्रकाश गाढवे, रत्नकांत  भोसले गुरुजी, नगराध्यक्ष सचिन शेळके, राजेंद्र डोईफोडे, साजिद बागवान, सर्फराज बागवान आदी प्रमुख उपस्थित होते.
 
श्री. निंबाळकर म्हणाले,"" ऍड. बागवान हे मोठ्या मनाचे तितकेच हट्टी स्वभावाचे होते. शेती पाटपाणी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. धोम-बलकवडीच्या पाण्यासाठी ते बरोबर होते. नीरा-देवघरच्या पाण्यासाठीही त्यांचा संघर्ष कायम होता. निष्ठेचे आणि तत्त्वाचे राजकारण करणाऱ्यांपैकी ते होते. सत्ता ही सर्वसामान्यांच्या हितासाठी असते, हे तत्त्व बाळगून सत्तेचा वापर सामान्यांसाठी करत राहिले. त्यांचा विचार पुढे नेला पाहिजे.''

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,"" कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचा बाळासाहेबांशी संबंध आला. आमच्या मातोश्री यांच्यासमवेत काम करताना त्यावेळी कॉंग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली होती. त्यामध्ये बाळासाहेब अग्रणी होते. शेतीला पाणी मिळाल्याखेरीज खंडाळा तालुक्‍यातील शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब जनता सुखी होणार नाही, याची तळमळ त्यांना होती. शेती पाण्यासाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेऊन ते काम करत होते. नगरपंचायतीसाठी त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा करून नगरपंचायत अस्तित्वात आणली. सर्वधर्मसमभावाचा त्यांचा आदर्श विचार येथील पुढील पिढीने जोपासावा.'' 
 

Covid Vaccine : कोरोनावर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली कऱ्हाडात लस

या वेळी आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, हरीष पाटणे, सुरेश जाधव, मनोहर शिंदे, विराज शिंदे, नितीन भरगुडे, आनंदराव शेळके-पाटील, प्रा. एस. वाय. पवार, रवींद्र डोईफोडे, प्रा. के. बी. पाटील, हणमंतराव शेळके, शैलजा खरात, दादासाहेब शेळके, शामराव धायगुडे, नंदकुमार खरात, हर्षवर्धन भोसले, प्रा. रघुनाथ शेळके, राजू इनामदार, बाबा लिम्हण आदींनी मनोगते व्यक्त केली. 

जिल्हा परिषदेत एजंटगिरी चालू देणार नाही; उदय कबुलेंचा इशारा

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top