कऱ्हाड : केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

हेमंत पवार
Sunday, 4 October 2020

कॉंग्रेसच्या वतीने यापुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा त्यांनी या वेळी दिला. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात आणि दोन्ही विधेयके मागे घ्यावीत, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कऱ्हाड : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील विधेयक त्वरित मागे घ्यावे, या मागणीसाठी कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसच्या वतीने येथील कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यालगत धरणे आंदोलन केले.
 
आंदोलनात कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, डॉ. इंद्रजित मोहिते, कॉंग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, शहराध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजित चव्हाण, अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, विद्या थोरवडे, सुनील बरिदे, नगरसेविका गीताजंली पाटील, बाळासाहेब गलांडे, आनंदी शिंदे, स्वाती तुपे, सागर जाधव, अमित जाधव यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यटनाला आस मंदिरे खुली होण्याची मात्र अशी घ्यावी लागेल काळजी  

उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले,"" राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश कॉंग्रेसच्या आदेशानुसार किसान व मजूर बचाव संविधान दिवस पाळला जात आहे. उत्तर प्रदेशात दलित मुलीबाबत जी दुर्घटना घडली आहे, त्याची दखल घेण्यासाठी जाताना पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी, राहुल गांधी यांची जी अडवणूक करून वागणूक दिली. त्या जंगली राजचा आम्ही निषेध करत आहोत.

शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचे बायोमायनिंग प्रकल्पाविरोधात आंदोलन

देशभरातील आंदोलनाची नोंद घेऊन केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांच्या विरोधातील विधेयक मागे घ्यावे, अन्यथा होणाऱ्या परिणामाला ते स्वतः जबाबदार राहतील.'' कॉंग्रेसच्या वतीने यापुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा त्यांनी या वेळी दिला. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात आणि दोन्ही विधेयके मागे घ्यावीत, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Agiation In Karad Satara News