esakal | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात

महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून सातारा जिल्ह्याचा आढावाही घेतला.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यामध्ये आज (शनिवार) सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दाेन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील समजू शकला मात्र प्रदेशाध्यक्षपदासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचा अंदाज  कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी वर्तविला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज उंडाळे येथे गेले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते कऱ्हाडला आले होते. त्यावेळी महसुलमंत्री थोरात आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाली. औरंगाबादचे नामकरण याबाबत किंवा काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्मुल्याबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपुर्वी भाष्य केले होते.  त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. दाेन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीबाबत आमदार चव्हाण यांना विचारले असता ते केवळ स्मित हास्य करुन त्यांच्या वाहनातून रवाना झाले.

भाजपचा कायदा हातात घेण्याचा इशारा; गृहराज्यमंत्र्यांचे सातारकरांना शांततेचे आवाहन  

एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी महसुलमंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना बोलावून काही महत्त्वाच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडून जिल्ह्याचा आढावाही घेतला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुरेश जाधव,  मनोहर शिंदे,  शिवराज मोरे,  इंद्रजीत चव्हाण, हिंदुराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top