
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
Satara Politics : 'या' सर्व निवडणुका काँग्रेस, वंचित आघाडी एकत्र लढणार; माजी मुख्यमंत्र्यांसोबत पुढील बैठक
सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस (Congress) आणि सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे या सर्व निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढविणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
काँग्रेस भवनात नुकतीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव व वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई (सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या वेळी डॉ. जाधव यांन श्री. देसाई यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. दोन्ही पक्षांचे या चर्चेद्वारे समाधान झाले. तसेच हातात हात घालून साथ देण्याचे ठरले.
या निवडणुकांबाबत पुढील संवाद बैठक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ खरात आणि इतर मान्यवर उपस्थित होते.