esakal | अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत

नियमांचे उल्लंघन केल्याने प्रसिद्ध अभिनेते अमिर खान यांच्या वाहनावर देखील काही वर्षांपुर्वी साबळे यांनी कारवाई केली हाेती. सातारा शहरातील काेणत्याही पाॅईंटवर त्यांची नेमुणक असाे त्यांच्या शिस्तीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. 

अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा शहरातील बसस्थानकातील शिवशाही बसने बुधवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. त्यानंतर ही आग भडकली आणि पाच गाड्या जागेवरच जळून खाक झाल्या. ही आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभाग तत्परेतने घटनास्थळी आले. सर्वांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल दोन तासांच्या परिश्रमानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले. हे बचावकार्य करत असताना अग्निशमन विभागाचे प्रमुख सौरभ साळुंखेंची एक तोळ्याची अंगठी अचानक त्यांच्या बोटातून निसटून पडली हाेती. ही अंगठी सातारा पाेलिस दलातील वाहतुक शाखेत कार्यरत असलेले संजय साबळे यांनी सापडली हाेती. 

घटनास्थळी सौरभ साळुंखे यांनी आपल्या बोटातील अंगठी पडल्याने शाेधा शाेध सुरु केली. ही बाब साबळेंच्या  निदर्शनास आली. साळुंखेंनी साबळेंना सर्व हकीकत सांगितली. यानंतर संजय साबळे यांनी ओळख पटवून एक तोळ्याची अंगठी सौरभ साळुंखे यांच्याकडे सुपूर्द केली. साबळेंनी अंगठी देताच साळूंखेंचे डाेळे भरुन आले. साबळे यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे उपस्थितांनी भरभरुन कौतुक केले.

वाहतुक पाेलिस शाखेत अनेक वर्ष कार्यरत असलेले संजय साबळे हे चर्चेतले व्यक्तिमत्व आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने प्रसिद्ध अभिनेते अमिर खान यांच्या वाहनावर देखील काही वर्षांपुर्वी साबळे यांनी कारवाई केली हाेती. सातारा शहरातील काेणत्याही पाॅईंटवर त्यांची नेमुणक असाे त्यांच्या शिस्तीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा साबळे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल चर्चेत आले आहेत.

सातारा : कर्तव्यदक्ष हवालदार संजय साबळे पून्हा चर्चेत

काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!

राजधानीच्या पोरांची गगन भरारी; जागतिक उपग्रह प्रक्षेपणात सातारी पंच, मोदींकडून कौतुक

मायबाप सरकारला तमाशा कलावंताची आर्त साद

loading image
go to top