"कृष्णा, 'किसन वीर'सह सातारा जिल्हा बॅंकेची रंगणार निवडणुक

"कृष्णा, 'किसन वीर'सह सातारा जिल्हा बॅंकेची रंगणार निवडणुक

सातारा : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती मंगळवारी (ता.२) राज्य शासनाने मागे घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, कृष्णा कारखाना, किसन वीर कारखाना आणि सूतगिरणींच्या निवडणुका होतील. त्यामध्ये जिल्हा बॅंक व कृष्णा कारखान्याची निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज आहे, तर किसन कारखान्यासाठी पॅनेल टाकण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. 

कोरोनामुळे स्थगिती दिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली. ग्रामपंचायत निवडणुकीचा ताण कमी झाल्याने सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता मोठ्या संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयारी दर्शविली. परिणामी, मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचे पत्र विभागीय सहनिबंधकांना पाठविले. त्यानुसार आजपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली. स्थगिती देताना ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया थांबली होती. तेथून पुढे प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यातील जिल्हा बॅंक, कृष्णा कारखाना, किसन वीर कारखान्यांची निवडणूक होणार आहे. 

जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधकांची आज (बुधवार) बैठक होऊन सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामध्ये जिल्हा बॅंकेसाठी ठराव प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. जिल्हा बॅंकेचे निम्मे ठराव यापूर्वीच झाले होते. आता उर्वरित अपूर्ण ठराव पूर्ण केले जाणार आहेत. त्यासाठी साधारण पाच ते दहा दिवसांची मुदत मिळेल. त्यानंतर ठरावांवर आक्षेप व सुनावणी होऊन मतदार यादी अंतिम केली जाईल. त्यानंतर दोन- चार दिवसांत प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. साधारण फेब्रुवारीतच जिल्हा बॅंकेची निवडणूक पूर्ण होईल. कृष्णा कारखान्याचीही मतदार यादीची प्रसिद्धी होऊन त्यावर सुनावणी व हरकती घेतल्या जातील. सध्या या कारखान्याच्या बोगस सभासद नोंदणीवरून वाद उफाळलेला आहे. त्यामुळे या सभासदांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क अबाधित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

"किसन वीर'साठी राष्ट्रवादीची तयारी 

किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत या वेळेस भाजपचे नेते व विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांच्या पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पॅनेल असेल. त्यासाठी आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांनी पॅनेल बांधण्यास सुरवात केली आहे. विद्यमान संचालकांवर नाराज असलेल्या संचालकांसह सभासदांना एकत्र करण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे किसन वीर कारखान्यातही राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचे पॅनेल अशीच लढत पाहायला मिळेल.

ऐषआराम करण्यासाठी हृदया गुप्ताने 81 लोकांना 13 कोटींना फसविले; पुण्यासह नगर, बीड, सातारकरांचा कपाळावर हात

ओबीसींची जनगणना करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; संघटनेचा प्रशासनाला गर्भित इशारा
 
सावधान! ओंड-उंडाळे मार्ग बनला जीवघेणा; अरुंद रस्ता, खड्ड्यांमुळे करावी लागतेय कसरत

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात कऱ्हाडात मनसेची निदर्शने

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com