पाचगणी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांसह सहा बाधित

पाचगणी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांसह सहा बाधित

भिलार (जि. सातारा) : पाचगणी पोलिस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला असून, मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांसह सहा जणांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती पाचगणी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम यांनी दिली. 

कोरोना योद्‌ध्यांनाच कोरोनाने गाठल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाने यापूर्वी नगरपालिका कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, शाळा व हॉटेलमध्येही शिरकाव केल्याने हा संसर्ग वाढणार, अशी चिन्हे होती. यातून सुटलेल्या पोलिस ठाण्यालाही आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे. काल पोलिस ठाण्यातील पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांपैकी 20 जणांचे रिपोर्ट बेल एअर येथे तपासणी केले होते. त्याचे रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा आले. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाचगणी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करीत पाचगणी शहर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. लॉकडाउन काळात तर या कर्मचाऱ्यांनी अगदी उपाशीपोटी बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी पाचगणी शहरातील काही सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला होता. कोरोना योद्‌ध्याची भूमिका बजावणाऱ्या आणि शहरात बंदोबस्त कडक ठेवणाऱ्या या योद्‌ध्यांना कोरोना संसर्ग झाल्याने पाचगणीकर नागरिक त्यांना या संकटातून सुखरूप बाहेर येण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com