सातारा : 'नवोदय’मध्ये कोरोनाचा शिरकाव

सुमारे २० ते २५ विद्यार्थी, दहा शिक्षक गृहविलगीकरणात
Corona
Corona sakal

सातारा : जवाहर नवोदय विद्यालयातील सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली. या विद्यार्थ्यांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहेत. या मुलांच्या संपर्कात आलेले सुमारे दहा शिक्षकही बाधित आढळले आहेत. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित नसलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी घरी घेऊन जाण्याचा पर्याय ठेवला आहे. या विद्यार्थ्यांवर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेऊन उपचार केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Corona
शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा आकडा वाढू लागल्याने राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती; पण जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी असल्याने तेथील विद्यार्थी शाळेतच निवासी शिक्षण घेत आहेत. मागील आठवड्यात काही विद्यार्थ्यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये काही विद्यार्थी बाधित आढळले. त्यानंतर बाधित विद्यार्थ्यांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. शाळेतील शिक्षकांचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये नऊ ते दहा शिक्षक बाधित आढळले. त्यामुळे या शिक्षकांचे विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Corona
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तरूणांनी संतभूमीचा लौकिक वाढविला

यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘नवोदय विद्यालयाची काही मुले बाधित आढळली होती. त्यानंतर त्यांचे तातडीने गृहविलगीकरण केले आहे. जे विद्यार्थी बाधित नाहीत, त्यांच्या पालकांना मुलांना घरी घेऊन जाण्याचा पर्याय ठेवला आहे.’’

मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने येथील नववी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निवासी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मुले एकत्र राहात असल्याने बाधितांचा आकडा जास्त वाटत आहे; पण तशी गंभीर परिस्थिती नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com