esakal | साताऱ्यात कैद्यांच्या सुरक्षेसाठी आता स्वतंत्र कारागृह
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात कैद्यांच्या सुरक्षेसाठी आता स्वतंत्र कारागृह

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांतील संशयितांना न्यायालयीन कोठड मंजूर झाल्यानंतर कारागृहात आणण्यात येते; परंतु पूर्वीप्रमाणे या संशयितांना आता थेट कारागृहात नेण्यात येत नाही. पहिल्यांदा त्यांना तात्पुरत्या कारागृहात नेले जाते.

साताऱ्यात कैद्यांच्या सुरक्षेसाठी आता स्वतंत्र कारागृह

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठीची उपाययोजना म्हणून शहरामध्ये तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या कच्च्या कैद्यांना त्यामध्ये ठेऊन कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मुख्य कारागृहांमध्ये पाठविण्यात येणार आहे.
उंच गणेशमूर्तींचं करायचं काय?
 
कारागृहातील कैद्यांची कोरोनापासून सुरक्षा हा राज्यातील कारागृह व्यवस्थापनासमोर सध्या मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्येही लॉकडाउनच्या कालावधीत पुणे येथील येरवडा कारागृहातून काही कैदी जिल्हा कारागृहात आणण्यात आले होते. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून पुण्याहून आलेल्या या कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले होते; परंतु त्यातील एका कैद्याला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर एक-एक करत कोरोना बाधितांचा आकडा 15 वर गेला. जिल्हा कारागृहाला कोरोनाचा हा पहिला झटका बसला होता. त्यानंतर अन्य कैद्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुण्याहून आलेल्या व बाधित कैद्यांना ठेवण्यासाठी महामार्गालगतच्या एका महाविद्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आली होती. संशयितांकडून कोरोनाबाधित होण्याचा झटका तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नुकताच बसला.

सातारकरांनाे गुड न्यूज : पृथ्वीराज चव्हाणांमुळे महत्त्वाचा प्रश्न सुटला 

लाखाे नेटकरी भावुक 

एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या संशयिताला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन व्हावे लागले होते. सध्या समाजामध्ये वावरत असलेल्या कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही हे तपासणीशिवाय स्पष्ट होत नाही. त्यातच काही जणांना कोरोना संसर्गाची लक्षणे नसतात किंवा काहींना अत्यंत सौम्य अशी लक्षणे असतात. त्यातून त्रास होत नसल्यामुळे त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे हेच समजत नाही; परंतु तो व्यक्ती अन्य नागरिकांना बाधा करण्यासाठी विषाणूचा वाहक म्हणून काम करत असतो. त्यातून इतरांना बाधा होत असल्याचे जिल्हा कारागृहातील घटनांमधून समोर आले आहे.

शासकीय सेवानिवृत्तांना मिळणार आता खास ओळखपत्र!

जिल्हा कारागृहामध्ये एकाच बराकीमध्ये पाच ते सहा कैदी असतात. काही बराकीमध्ये हा आकाडा दहा ते 15 पर्यंतही जातो. शारीरिक अंतर पाळून त्यांना राहता येणार नाही अशी परिस्थती असते. त्यामुळे अशा स्थितीत विषाणूचा वाहक त्यांच्यात मिसळल्यास सर्वांना बाधा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी कारागृह व्यवस्थापनाने दक्षता म्हणून उपाययोजना केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामार्गालगतच्या एका महाविद्यालयामध्ये तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरक्षेची सर्व यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. 

गृहमंत्र्यांसमाेर त्याचे गंभीर वर्तन, कदाचित मोठी किंमत मोजावी लागली असती

मुख्य कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेसाठी... 

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांतील संशयितांना न्यायालयीन कोठड मंजूर झाल्यानंतर कारागृहात आणण्यात येते; परंतु पूर्वीप्रमाणे या संशयितांना आता थेट कारागृहात नेण्यात येत नाही. पहिल्यांदा त्यांना तात्पुरत्या कारागृहात नेले जाते. लगेचच जामिनाची प्रक्रिया होणार असेल ते त्या ठिकाणीच असतात; परंतु ज्यांचा लवकर जामीन होण्याची शक्‍यता नसते अशांचा त्याठिकाणी प्रथम कोरोनाच्या चाचणीसाठी नमुना घेण्यात येतो. या तपासणीमध्ये संबंधित संशयित कोरोना पॉझिटिव्ह आला नाही, तरच त्याला कारागृहामध्ये नेण्यात येते. या प्रक्रियेमुळे कारागृहातील अन्य कैद्यांची कोरोनापासून सुरक्षा होण्यास मदत होत आहे.

पत्रास कारण की.. हेच विसरत चाललोय आपण!

धाडसी निर्णय..! सातारकरांनाे अटी वाचा

Edited By : Siddharth Latkar

loading image