धोका कायम! साताऱ्यात रुग्णसंख्या हजार पार; जिल्ह्यात 24 तासात 23 बाधितांचा मृत्यू

corona
coronaesakal

सातारा : सध्या सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादु्र्भाव कमी येत असला, तरी धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कोरोना वाढीला आळा बसला असून प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1193 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा (Corona Patient) मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Corona Test Positive Of 1196 Citizens In Satara District Today)

Summary

सध्या सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादु्र्भाव कमी येत असला, तरी धोका कायम आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 31 (7906), कराड 133 (23627), खंडाळा 73 (10997), खटाव 398 (17284), कोरेगांव 163 (15271), माण 54 (11988), महाबळेश्वर 11 (4133), पाटण 51(7400), फलटण 66 (27173), सातारा 185 (36943), वाई 25 (11947) व इतर 6 (1119) असे आजअखेर एकूण 175788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

corona
'महाबळेश्‍वरचा विकास खुंटला म्हणणाऱ्या शिंदेंच्या बालिश बुध्दीची किव येते'

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 2 (179), कराड 3 (681), खंडाळा 1 (140), खटाव 0 (430), कोरेगांव 2 (335), माण 2 (232), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (161), फलटण 1 (264), सातारा 12 (1108), वाई 0 (313) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 1196 Citizens In Satara District Today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com