साताऱ्यात उद्रेक कायम! जिल्ह्यात आजअखेर 3061 जणांचा मृत्यू, तर 131160 जण बाधित

जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने प्रत्येक तालुका चिंतेत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कोरोना रूग्णांसह नातेवाईकांची जिवाच्या आकांताने धडपड सुरू आहे.
Corona
Corona esakal

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या (Coronavirus) संकटाने प्रत्येक तालुका चिंतेत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कोरोना रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची जिवाच्या आकांताने धडपड सुरू आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2065 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 48 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 2065 Citizens In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 86 (6214), कराड 212 (18983), खंडाळा 107 (8129), खटाव 221 (11522), कोरेगांव 204 (11221), माण 152 (8774), महाबळेश्वर 13 (3581), पाटण 114 (5409), फलटण 308 (17479), सातारा 519 (29454), वाई 110 (9621 ) व इतर 19 (753) असे आजअखेर एकूण 131160 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 3 (135), कराड 8 (533), खंडाळा 4 (107), खटाव 9 (317), कोरेगांव 3 (271), माण 1 (169), महाबळेश्वर 0 (40), पाटण 1 (133), फलटण 6 (225), सातारा 7 (871), वाई 6 (260) व इतर 0 असे आजअखेर जिल्ह्यात एकूण 3061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

अजित पवारांनी शासन निर्णय रद्द करण्याचा दिला आदेश; वाचा सविस्तर

ऑक्सिजन प्लांटला 'यशवंत'ची संजीवनी; सातारा, सांगलीत 1250 लिटरची निर्मिती

Corona Test Positive Of 2065 Citizens In Satara District

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com