साताऱ्यात उद्रेक सुरुच! जिल्ह्यात 24 तासात 2292 बाधित, तर 40 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली असून मृत्यूचा आकडाही वाढताना दिसत आहे.
Corona
Coronaesakal

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूने (coronavirus) थैमान घालायला सुरुवात केली असून मृत्यूचा आकडाही वाढताना दिसत आहे. दररोज दोन हजाराच्या वरती रुग्ण आढळत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. हा आकडा असाच राहिला तर येणारी परिस्थिती खूपच धक्कादायक आणि भयावह असणार आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2292 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 40 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. (Corona Test Positive Of 2292 Citizens In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 92 (5527), कराड 279 (17285), खंडाळा 81 (7139), खटाव 312 (10035), कोरेगांव 127 (9743), माण 179 (7467), महाबळेश्वर 36 (3468), पाटण 144 (4827), फलटण 392 (15175), सातारा 483 (26393), वाई 147 (8731 ) व इतर 20 (627) असे आजअखेर एकूण 116417 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 2 (108), कराड 6 (475), खंडाळा 4 (92), खटाव 3 (281), कोरेगांव 4 (253), माण 1 (152), महाबळेश्वर 0 (34), पाटण 0 (123), फलटण 3 (197), सातारा 12 (805), वाई 5 (220) , व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2740 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Corona Test Positive Of 2292 Citizens In Satara District

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com