सत्तरीतले शिवाजी घाडगे म्हणतात, डोळ्यांदेखत सहा गेले; पण घाबरलो नाही!

सत्तरीतले शिवाजी घाडगे म्हणतात, डोळ्यांदेखत सहा गेले; पण घाबरलो नाही!

मायणी (जि. सातारा) : केवळ जगण्याची जिद्द असल्यामुळे मरणाच्या दारातून मी परत आलो. माझ्या डोळ्यादेखत रुग्णालयात सहा रुग्ण दगावले. मात्र, मी घाबरलो नाही. खंबीर, ठाम राहिलो. वयाच्या सत्तरीत धीरोदात्तपणे परिस्थितीचा सामना केला. मी एवढंच सांगेन की कोरोना रुग्णाला त्या काळात कुटुंबीयांसह, नातेवाईकांचा आधार अतिशय महत्त्वाचा आहे. मानसिक आधारामुळे अनेक रुग्ण बरे होतील असा सल्ला काेराेनावर मात करुन परतलेल्या शिवाजी घाडगे यांनी दिला आहे.

ते म्हणाले मला आधी युरिन इन्फेक्‍शनचा त्रास सुरू होता. म्हणून मी खासगी दवाखान्यात उपचार घेत होतो. दरम्यान, मला प्रचंड अंगदुखी सुरू झाली. ताप तसा नकळतच होता. पण, धाप लागू लागली. म्हणून खासगी दवाखान्यातच छातीचा एक्‍स-रे काढून घेतला. त्यामध्ये न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. मात्र, पुढील उपचार करण्यासाठी खासगी डॉक्‍टरने ऍडमिट करून घ्यायला नकार दिला.
 
कोरोनाची तपासणी करून घ्या. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच पुढील उपचार करता येईल असे सांगितले. मग तपासणीसाठी आम्ही येथील मेडिकल कॉलेजमध्ये गेलो. मात्र, वेळ संपल्यामुळे त्यादिवशी तपासणी होऊ शकली नाही. अखेर रॅपिड टेस्ट केली. त्या टेस्टमध्ये माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, धाप लागत असल्यामुळे मला ऑक्‍सिजन देण्यास सुरुवात केली. घरीच ऑक्‍सिजन सिलिंडर आणले. दुसऱ्या दिवशी आरटीपीसीआर टेस्टसाठी पुन्हा मेडिकल कॉलेजमध्ये गेलो. टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग मात्र, सगळेच हादरून गेले. धाप वाढतच होती. बेडसाठी सकाळी आठपासून मुलगा सचिन फोनाफोनी करीत होता. कऱ्हाड, सातारा, पुणे येथील चार ठिकाणी, अगदी रुबी हॉललासुद्धा संपर्क साधला. मात्र, तिथेही तीन दिवसांचे "वेटिंग' असल्याचे सांगण्यात आले. खूप प्रयत्नानंतर येथील मेडिकल कॉलेजमध्ये 
एक बेड उपलब्ध करून देण्यात आला. तोपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले.

कोरोनाशी दोन हात करून आशा स्वयंसेविका सुमन पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

तेथील डॉ. खाडे व त्यांच्या "टीम'ने तातडीने उपचार सुरू केले. समुपदेशन केले. व्यायाम करून घेतला. माझ्याजवळ माझ्या मुलाला थांबण्याची परवानगी दिली. तो एक मला मोठा मानसिक आधार मिळाला. 23 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यापैकी 18 दिवस ऑक्‍सिजन लावलेला होता. तीन दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो. अगदी जगण्याची जिद्द असल्यामुळे मरणाच्या दारातून मी परत आलो.

माझ्या डोळ्यादेखत तेथे सहा रुग्ण दगावले. मात्र, मी घाबरलो नाही. खंबीर राहिलो. वयाच्या सत्तरीत धीरोदात्तपणे परिस्थितीचा सामना केला. मी एवढंच सांगेन की कोरोना रुग्णाला त्या काळात कुटुंबीयांचा, नातेवाईकांचा आधार अतिशय महत्त्वाचा आहे. मानसिक आधारामुळे अनेक रुग्ण बरे होतील.

पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड!

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com