esakal | Covid19 : सातारा जिल्ह्यात 34 बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Covid19 : सातारा जिल्ह्यात 34 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात विविध शासकीय व खासगी तपासणी केंद्रात आतापर्यंत ऍन्टीजनचे 48,538 रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 12,600 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 35,938 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

Covid19 : सातारा जिल्ह्यात 34 बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासात 708 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे. मंगळवारी (ता.22) 34 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसात 500 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तर 807 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
 
जिल्ह्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात 708 जणांना बाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णांविषयी तपशील समजू शकला नाही. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 34 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये वाढे, रहिमतपूर, शेंद्रे, कोंडवे, गडकरआळी सातारा, निगडी, रामाचा गोट सातारा, चरेगाव, चिंचळी, मंगळवार पेठ सातारा, काशीळ तसेच विविध खासगी हॉस्पिटलमधील शाहूपुरी, सासकल, कोरेगाव, गोपूज, सदाशिव पेठ सातारा, मुंबई, कृष्णानगर सातारा, पाटण, वडूथ, कऱ्हाड, जत, गजानन हाउसिंग सोसायटी कऱ्हाड, बोरगाव (वाळवा), मलकापूर, बनवडी कॉलनी कऱ्हाड, रेठरे बुद्रुक, बनवडी कऱ्हाड, आगाशिवनगर, शिवाजी हाउसिंग सोसायटी कऱ्हाड प्रत्येकी एक व सदरबझार दोन, शनिवार पेठ कऱ्हाड दोन अशा एकूण 34 जणांचा समावेश आहे.

कोयना धरणातून नदी पात्रात 1050 क्यूसेक विसर्ग
 
साेमवारी रात्रीच्या अहवालानुसार 690 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या बाधितांची तालुका व गावनिहाय संख्या : सातारा तालुका : सातारा 38, करंडी 3, सोनगाव 4, कोंढवे 2, लिंब 5, लावंघर 7, करंजे 4, दौलतनगर 8, शाहूनगर 7, गुरुवार पेठ 3, गोवे 3, स्वरुप कॉलनी करंजे 3, गोळीबार मैदान 2, व्यंकटपुरा पेठ 2, यादोगोपाळ पेठ 2, शाहूनगर गोडोली 5, कोंडवे 8, सोमवार पेठ 3, शाहूपुरी 8, सदरबझार 8, वाढे 2, रविवार पेठ 4, रामाचा गोट 2, शनिवार पेठ 3, संगमनगर 3, कृष्णानगर 3, मंगळवार पेठ 5, विलासपूर 2, गोडोली 6, नागठाणे 4, गडकर आळी 2, पाडळी 2, जकातवाडी 2, अजिंक्‍य कॉलनी 2, मल्हारपेठ 2, केसरकर पेठ 3, कारंडवाडी 3, वाढे फाटा 3, खेड 5, दुर्गा पेठ 2, पिरवाडी 3, डबेवाडी 2, जरंडेश्वर नाका 2.

कुणी पक्का रस्ता देता का पक्का रस्ता..!

गेंडामाळ, पाटखळ, क्षेत्र माहुली, गोजेगाव, कूपर कॉलनी, लक्ष्मी अर्पाटमेंट, यशोदानगर, श्रीनाथ कॉलनी, देवी चौक, कोडोली, बुधवार पेठ, जुनी एमआयडीसी, गडकर आळी, उत्तेकर कॉलनी, साठेवाडी, सोनगाव, नक्षपुरा, विजयनगर, राधिका रोड, जावळवाडी, सैदापूर, करंजेकर पेठ, तामजाईनगर, सासपडे, शेंद्रे, गुरुवार पेठ, विसावा नाका, नुने, गणेश चौक, रेल्वे स्टेशन, देशमुख कॉलनी, हेरंबनगर, राजसपुरा पेठ, कामठीपुरा, पाटखळ, आनेवाडी, संगमनगर, आरळे, समर्थमंदिर, गुजर आळी, गणेशनगर, वनवासवाडी प्रत्येकी एक.
 
कऱ्हाड तालुका : कऱ्हाड 11, विंग 4, रुक्‍मिीणी स्टेट 3, शुक्रवार पेठ 7, कापिल 4, मलकापूर 3, आगाशिवनगर 7, उंब्रज 10, रुक्‍मिणीनगर 2, शिवनगर 3, तांबवे 3, कार्वे 3, शनिवार पेठ 2, रेठरे बुद्रुक 4, खोडशी 3, काले 4, आबाचीवाडी 2, विद्यानगर 2, पाडळी हेळगाव 2, तळबीड 2, मैत्री पार्क 2, वाखण 3, मंगळवार पेठ 3, साळशिरंबे 2, शिक्षक कॉलनी 2, कोळेवाडी 2, वाखाण रोड 2, गजानन सोसायटी 2, पार्ले 2, इंदोली 3, वाटेगाव, कुंभी, म्हासोली, वहागाव, शेवाळेवाडी, शिवदे, शनिवार पेठ, करवडी, वडोली, गुरुवार पेठ, गोपूज, सोमवार पेठ, अमरापूर, मल्हारपेठ, सैदापूर, प्रतापसिंहनगर, शेणोली, कळमवाडी, वडगाव, वांगी, नेरले, सुपने, तारळे, मानेगाव, गोवारे, ढेबेवाडी, गोळेश्वर, वडगाव हवेली, वाठार, गुरुवार पेठ, येरवळे, शिंदे वस्ती, वडोली निळेश्वर, आटके, काजीवाडा, कार्वे नाका, मुंढे, हिंगोले, शेणोली स्टेशन प्रत्येकी एक.

फलटण तालुका : फलटण 11, शिंदेनगर 2, घाडगेमळा 2, पोलिस कॉलनी 3, जाधववाडी 2, लक्ष्मीनगर 6, कोळकी 2, डेक्‍कन चौक लक्ष्मीनगर 2, मलठण 2, सस्तेवाडी 2, बुधवार पेठ 2, मारवाड पेठ 3, शुक्रवार पेठ 2, फडतरवाडी 2, राजाळे 4, विडणी 2, गोळीबार मैदान, मंगळवार पेठ, बिरदेवनगर, कसबा पेठ, गोखळी, धुळदेव, सन्मतीनगर, साठेफाटा, शारदानगर कोळकी, दुधेबावी, खुंटे, विवेकानंदनगर, सांगवी, झिरपवाडी, कसबा पेठ, सगुणामातानगर, गणेशशेरी, राजाळे, शिवाजीनगर, आदर्की, आळजापूर, जिंती, निंभोरे प्रत्येकी एक.

आई माझी काळुबाई चित्रिकरणाची चाैकशी हाेणार ?

वाई तालुका : वाई 8, कवठे 4, कणूर 2, बावधन 4, गुळुंब 5, आसले, विराटनगर, सुरूर, धोम, दरेवाडी, सोमजाईनगर, केंजळ, सोनगिरवाडी, मधली आळी, शेंदूरजणे, यशवंतनगर, बेलमाची, अनपटवाडी, व्याजवाडी, ओझर्डे प्रत्येकी एक. पाटण तालुका : पाटण 4, गराळेवाडी 2, नडे, तारळे, मल्हारपेठ, येराडवाडी, गावडेवाडी, कोयनानगर, मालदन प्रत्येकी एक.

खंडाळा तालुका : खंडाळा 2, लोणंद 2, शिरवळ 3, हरताली 2, जावळी 2, पाडेगाव 2, भाटघर, बावडा, पारगाव खंडाळा, खेड बुद्रुक, नायगाव प्रत्येकी एक. खटाव तालुका : खातगुण 7, वाकळवाडी 3, नडवळ 2, गुरसाळे 3, तडवळे 4, वडूज 16, शेनवडी 2, साठेवाडी, पुसेगाव, डिस्कळ, चितळी, कलेढोण, विसापूर, मायणी, राजाचे कुर्ले, खरशिंगे, गोरेगाव प्रत्येकी एक. माण तालुका : मलवडी 4, म्हसवड 2, दहिवडी 2, श्रीपालवन, ढाकणी, गोंदवले बुद्रुक प्रत्येकी एक.

कोरेगाव तालुका : कोरेगाव 5, सातारारोड 5, धामणेर 2, करंजखोप 2, तडवळे 2, निगडी 4, वाघोली, जांब, सोनके, एकसळ, फडतरवाडी, रहिमतपूर, पिंपोडे बुद्रुक, जळगाव, किरोली प्रत्येकी एक. जावळी तालुका : मेढा 2, आनेवाडी 3, सोनगाव 3. 
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर 2, क्षेत्र महाबळेश्वर 10, मेटगुताड 3, कुडाळ 2, मोरघर, महिगाव, भुटेघर, अवकाळी प्रत्येकी एक. इतर : 7, बाहेरील जिल्ह्यातील : इस्लामपूर 3, नरसिंहपूर वाळवा, कुंडल, हवालदारवाडी सोलापूर, वाल्हे पुणे, सांगली, तासगाव प्रत्येकी एक. 

काही तासात नेटकऱ्यांना प्रेमात पाडणारा, कपल चॅलेंज ट्रेंड नेमका आहे तरी काय? 


ऍन्टीजनची 45, 538 जणांची तपासणी 

जिल्ह्यात विविध शासकीय व खासगी तपासणी केंद्रात आतापर्यंत ऍन्टीजनचे 48,538 रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 12,600 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 35,938 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 


घेतलेले एकूण नमुने : 1,13,178
 
एकूण बाधित : 31,514
 
घरी सोडण्यात आलेले : 21,625
 
मृत्यू : 940
 
उपचारार्थ रुग्ण : 8,949

Edited By : Siddharth Latkar