सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांच्या मृत्यूची संख्या घटेना

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 7 October 2020

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 1273 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तसेच 7255 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात उपचारादरम्यान 22 काेराेनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान 476 जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तर 619 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत उपचारादरम्यान 22 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुसेगाव (ता. खटाव) येथील 80 वर्षीय पुरुष, सोनगाव (ता. जावळी) येथील 52 वर्षीय पुरुष, शिवथरमधील (ता. सातारा) 49 वर्षीय पुरुष, येणके (ता. कऱ्हाड) येथील 80 वर्षीय पुरुष, कळंबेतील (ता. सातारा) 60 वर्षीय पुरुष, खराडवाडीमधील (ता. पाटण) 51 वर्षीय पुरुष, आंबळेतील (ता. पाटण) 70 वर्षीय पुरुष, देगाव (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, सिद्धेश्वर कुरोलीतील (ता. खटाव) 80 वर्षीय पुरुष, कोडोली (ता. कऱ्हाड) येथील 76 वर्षीय पुरुष, वरकुटे मलवडीतील (ता. माण) येथील 77 वर्षीय पुरुष, कऱ्हाड येथील 60 वर्षीय महिला, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील 83 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

सातारा : रुग्ण सेवेसाठी जम्बाे काेविड रुग्णालय सज्ज

याबराेबरच कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, राजापूरातील (ता. खटाव) 70 वर्षीय महिला, धनगरवाडी (ता. सातारा) येथील 91 वर्षीय पुरुष, केंजळमधील (ता. वाई) 54 वर्षीय महिला, कण्हेर (ता. सातारा) येथील 55 वर्षीय महिला, गोरेगाव वांगी (ता. खटाव) येथील 63 वर्षीय पुरुष, वडूजमधील (ता. खटाव) येथील 69 वर्षीय पुरुष, सोनगाव (ता. कोरेगाव) येथील 65 वर्षीय पुरुष, वरकुडे बुद्रुक (ता. शिराळा, सांगली) येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Patients Increasing In City Satara News