दुर्बल घटक शिष्यवृत्ती अनुदानात सावळागोंधळ; विद्यार्थी दोन वर्षांपासून प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्बल घटक शिष्यवृत्ती अनुदानात सावळागोंधळ; विद्यार्थी दोन वर्षांपासून प्रतीक्षेत

माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांमधील मुली व मुलांसाठी अनुदानित शाळांमध्ये एनएमएमएस योजना राबविण्यात येते. या योजनेत विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणाऱ्यांची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येते. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, मागील वर्षीच्या (2019-2020) पात्र विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही.

दुर्बल घटक शिष्यवृत्ती अनुदानात सावळागोंधळ; विद्यार्थी दोन वर्षांपासून प्रतीक्षेत

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेतील शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे मागील दोन वर्षांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. या विद्यार्थ्यांना रिन्युअलसाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज भरावयास सांगण्यात आले आहेत. 

मात्र, ऑनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणी येत असल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांमधील मुली व मुलांसाठी अनुदानित शाळांमध्ये एनएमएमएस योजना राबविण्यात येते. या योजनेत विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणाऱ्यांची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येते. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, मागील वर्षीच्या (2019-2020) पात्र विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही. या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, 2020-21 या वर्षीही शिष्यवृत्ती जमा न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. यामधील ज्या विद्यार्थ्यांचे अनुदान प्राप्त झाले नाही, अशा विद्यार्थ्यांची नावेही ऑनलाइन दिसत नाहीत. याविषयी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. 

लाचप्रकरणी भूमापकासह वाघेरीतील एकास अटक

रिन्युअलसाठी अर्ज भरताना अडचणी 
दरम्यान, शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचे अनुदान जमा न झाल्याने त्यांना रिन्युअलसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत, तसेच काही विद्यार्थ्यांची संकेतस्थळावर नावे दिसत नाहीत. याबाबत मागील वर्षी अनुदान प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांची मार्च महिन्यात ऑफलाइन, तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय विभागात माहिती देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top