सातारकरांनाे! घरीच रहा; पुढील दोन दिवस लस उपलब्ध होणार नाही

जिल्ह्यात 45 वर्षांपुढील सुमारे नऊ लाख नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यामधील जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडेसहा लाखांपर्यत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अजून चार लाख नागरिकांचे लसीकरण अपूर्ण असल्याने आरोग्य विभागाने पाच लाख लशीची मागणी केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
Corona Vaccination
Corona VaccinationMedia Gallery

सातारा : जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रावर शनिवारी कोव्हिशिल्ड लशीचा (Covishield Vaccine) साठा संपला होता, तर कोव्हॅक्‍सिन लस (Covaxin) सुमारे 8 हजार शिल्लक असल्याने काही केंद्रांवर लसीकरण सुरू होते. पुढील दोन दिवस जिल्ह्यात लस उपलब्ध होणार नसल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसणार आहे. (covaxin covishield vaccine shortage satara marathi news)

जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण मोहीमही गतीने सुरू होती. मात्र, सतत होणाऱ्या लशीच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोहिमेची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी कोव्हिशिल्ड 1400, तर कोव्हॅक्‍सिन 11 हजार 600 शिल्लक होती. मात्र, शनिवारी कोव्हिशिल्ड लस संपल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक केंद्रावर नागरिकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

दरम्यान, सुरुवातीला लसीकरण सत्रांची संख्या मोठ्या संख्येने होती. मात्र, मागील 15 दिवसांत लशीचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्यात सुमारे 120 लसीकरण सत्रे सुरू ठेवण्यात आली असून, 18 ते 45 वयोगटातील जिल्ह्यात 11 केंद्रे सुरू आहेत.

जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लस संपली असून, कोव्हॅक्‍सिन काही प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील काही केंद्रांवर लस सुरू होती. जिल्ह्याला जास्तीतजास्त लशीचा साठा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढील दोन दिवसांत लस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर लसीकरण केंद्राना लशीचे वाटप केले जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

पाच लाख लशीची मागणी

जिल्ह्यात 45 वर्षांपुढील सुमारे नऊ लाख नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यामधील जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडेसहा लाखांपर्यत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अजून चार लाख नागरिकांचे लसीकरण अपूर्ण असल्याने आरोग्य विभागाने पाच लाख लशीची मागणी केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Corona Vaccination
मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही, मीही 96 कुळी मराठाच : शशिकांत शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com