प्रतिपंढरपूर करहरमध्ये कोरोनाचा शिरकाव; विठू रखुमाईची पूजा घरीच करा, यात्रा समितीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

प्रतिपंढरपूर येथे विषाणूचा शिरकाव झाल्याने आषाढीदिवशी मंदिरासह लॉकडाउन राहणार आहे. त्यामुळे यंदा वारकरी व भाविकांनी आपल्या घरीच विठ्ठल-रखुमाई प्रतिमेचे पूजन करून दर्शन घ्यावे, असे आवाहन स्थानिक यात्रा समितीच्या सदस्यांनी केली आहे.
 

भिलार : आषाढी यात्रेच्या तोंडावरच प्रतिपंढरपूर करहरमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. यामुळे स्थानिक वारकरी आणि तालुका प्रशासनही हादरले आहे. आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा व धार्मिक कार्यक्रम मोजक्‍या लोकांच्या हस्ते करून मंदिर बंद ठेवत भाविकांना ऑनलाइन दर्शन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच करहरमध्ये रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित सापडल्याने गाव व बाजारपेठ प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर करून लॉकडाउन केले आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद असून, अगदी बॅंका, पतसंस्था या सहकारी संस्थाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून ग्रामस्थ व प्रशासनाने कडक निर्बंध घालत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता पसरली आहे. आषाढी एकादशी यात्रा बुधवारी असून, दरवर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेवर कोरोनाचे संकट घोंगावत असताना गावामधील व्यक्तीच पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यात्रेवर मर्यादा आल्या असताना या रुग्णामुळे आणखी मर्यादा येणार, हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी प्रशासनापुढे मात्र आणखी समस्या उद्‌भवली आहे. त्यामुळे या वर्षी प्रतिपंढरपूर पहिल्यांदाच वारकऱ्यांविना सुने सुने असणार आहे. विठ्ठल कुलूपबंद राहून ऑनलाइन दर्शन देणार आहे. 

घरीच पूजा करण्याचे आवाहन 

प्रतिपंढरपूर येथे विषाणूचा शिरकाव झाल्याने आषाढीदिवशी मंदिरासह लॉकडाउन राहणार आहे. त्यामुळे यंदा वारकरी व भाविकांनी आपल्या घरीच विठ्ठल-रखुमाई प्रतिमेचे पूजन करून दर्शन घ्यावे, असे आवाहन स्थानिक यात्रा समितीच्या सदस्यांनी केली आहे.

प्रसंगी शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा करु  : आमदार शशिकांत शिंदे 

Video : मोदी सरकार एका हातानं देतंय, दुसऱ्या हातानं घेतंय : पृथ्वीराज चव्हाण

महाबळेश्वर : अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Positive Patient Found In Karhar Near Satara District