esakal | सातारा-जावळी असा दुजाभाव मी कधीच केला नाही : शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा-जावळी असा दुजाभाव मी कधीच केला नाही : शिवेंद्रसिंहराजे

जिल्हा प्रशासनावर मोठा ताण असून, तीही आपल्यासारखी माणसं आहेत. त्यांनाही कुटुंब, मुलंबाळं आहेत, याचे भान ठेवून सर्वांनीच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. सातारा, जावळी असा दुजाभाव मी कधीही केला नाही, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सातारा-जावळी असा दुजाभाव मी कधीच केला नाही : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जावळी तालुक्‍यात बाधितांची संख्या वाढत असून, रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि रुग्ण बरे व्हावेत, यासाठी प्रशासनासह सर्वजण प्रयत्न करत आहेत. मेढा गामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. माझ्या कुटुंबातर्फे रुग्णसेवेसाठी डिजिटल एक्‍सरे मशिन या रुग्णालयास भेट दिले आहे. रुग्णांसाठी आवश्‍यक इंजेक्‍शन्स प्रशासनाने उपलब्ध करावीत. इंजेक्‍शन आणि औषधाविना रुग्ण दगावू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
 
मेढा गामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड केअर सेंटर प्रशासनाने सुरू केले. या सेंटरसाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी कुटुंबाच्या वतीने डिजिटल एक्‍सरे मशिन भेट दिले आहे. या कोरोना केअर सेंटरच्या प्रारंभप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नगराध्यक्ष अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष दत्ता पवार, विकास देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत यादव उपस्थित होते.

प्रतिसरकार चळवळीतील शेवटचा दुवा निखळला; सोपानराव घोरपडे यांचे निधन
 
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "जिल्हा प्रशासनावर मोठा ताण असून, तीही आपल्यासारखी माणसं आहेत. त्यांनाही कुटुंब, मुलंबाळं आहेत, याचे भान ठेवून सर्वांनीच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. सातारा, जावळी असा दुजाभाव मी कधीही केला नाही. मेढा हे तालुक्‍याचे ठिकाण असून, याठिकाणी तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. सर्वांवर उपचार होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सेंटर चालू झाले; पण इथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उणीव भासू देऊ नका.'' डॉ. चव्हाण , मिनाज मुल्ला यांचीही भाषणे झाली. श्री. पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले. या वेळी नगरसेवक, रुग्णालय समितीचे सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top