सातारा : लसीकरणाला बसली खीळ; खासगीत मिळेना शासकीयत गर्दी

जिल्ह्यात "कोव्हिशिल्ड' व "कोव्हॅक्‍सिन' या दोन प्रकारच्या लशी नागरिकांना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या डोससाठीच सध्या "कोव्हिशिल्ड' सध्या उपलब्ध आहे. परंतु, "कोव्हॅक्‍सिन'ची लस अनेक दिवसांपासून जिल्ह्यात उपलब्ध नाही. या लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर घ्यावा, असे पहिल्या लसीकरणावेळी नागरिकांना सांगण्यात आले होते. परंतु, आत्ता पहिल्या लसीकरणाला 45 दिवस उलटून गेले तरी अनेकांना दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. प्रशासनाने ही लस तातडीने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर किती दिवसांपर्यंत लस घेता येऊ शकते, याबाबतचा अधिकृत खुलासाही नागरिकांसाठी करावा लागणार आहे.
Covid 19 Vaccine
Covid 19 Vaccine esakal

सातारा : कोरोना लसीकरणाचा (Covid 19 Vaccination) वेग मंदावला असताना खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करून देणेही शासनाने बंद केले आहे. "थेट कंपनीकडून घ्या,' असे त्यांना सांगण्यात आले आहे. परंतु, कंपनीकडून रुग्णालयांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद पडणार आहे. त्यामुळे साहजिकच शासकीय लसीकरणावरील ताण वाढेल. कोरोना (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांनाही तातडीने लस मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. (Covid 19 Vaccination Centers Closed Central Government Private Hospital Government Hospital Satara Marathi News)

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मृतांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांचे तातडीने लसीकरण होणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सहा लाख 26 हजार 49 जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये पाच लाख 47 हजार 598 जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे तर, 78 हजार 441 जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या पाहता लसीकरणाचा हा आकडा अत्यंत कमी आहे. लसीकरण झालेल्यांना कोरोनापासून चांगले संरक्षण मिळत असल्याचे दिसत आहे. लसीकरण झालेल्यांना कोरोना झाल्याचे प्रमाणही खूप कमी आहे. त्यातही लशीमुळे त्यांचा आजार गंभीर स्थितीत गेला नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. परंतु, शासनाच्या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला खिळ पडत आहे.

जिल्ह्यात शासकीय पातळीवर सध्या 440 लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहे. त्यातून जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण होत होते. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनाही शासनाकडून लस उपलब्ध करून दिली जायची. ही लस सशुल्क दिली जात होती. तरीही अनेक नागरिक शासकीय केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये लस घेण्याला प्राधान्य देत होते. त्यामुळे सहाजिकच शासकीय लसीकरण केंद्रावरील ताण कमी होत होता. तसेच लसीकरणाचा वेग वाढण्यासही मदत होत होती. परंतु, आता केंद्र शासनाने खासगी दवाखान्यांना शासनाकडून लस उपलब्ध करून न देण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांनी थेट कंपन्यांकडून लस घेण्यास सांगण्यात आले आहे.

शासनाच्या या निर्णयानुसार खासगी रुग्णालयांनी लस उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन केले, ई-मेलही केले. परंतु, त्यांना कंपन्यांकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सध्या शासनालाही आवश्‍यक तेवढी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय लसीकरण दोन-तीन दिवस बंद ठेवावे लागते आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून कसा प्रतिसाद मिळेल, याची कल्पना धोरणकर्त्यांना येणे आवश्‍यक होते. परंतु, ती न आल्यामुळे खासगी रुग्णालयांतील लसीकरण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सहाजिकच शासकीय यंत्रणेवरील ताण वाढून लसीकरणाचा वेग मंदावणार आहे. या स्थितीत खासगी रुग्णालयांनाही लस उपलब्ध होण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

"कोव्हॅक्‍सिन'च्या दुसऱ्या डोसचे काय?

जिल्ह्यात "कोव्हिशिल्ड' व "कोव्हॅक्‍सिन' या दोन प्रकारच्या लशी नागरिकांना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या डोससाठीच सध्या "कोव्हिशिल्ड' सध्या उपलब्ध आहे. परंतु, "कोव्हॅक्‍सिन'ची लस अनेक दिवसांपासून जिल्ह्यात उपलब्ध नाही. या लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर घ्यावा, असे पहिल्या लसीकरणावेळी नागरिकांना सांगण्यात आले होते. परंतु, आत्ता पहिल्या लसीकरणाला 45 दिवस उलटून गेले तरी अनेकांना दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. प्रशासनाने ही लस तातडीने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर किती दिवसांपर्यंत लस घेता येऊ शकते, याबाबतचा अधिकृत खुलासाही नागरिकांसाठी करावा लागणार आहे.

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस : 5,56,190

दुसरा डोस : 83,473

एकूण लसीकरण : 6,39,663

Covid 19 Vaccine
Maratha Reservation : मराठा हरणार नाही! निधड्या छातीनं गुणवत्तेच्या जोरावर रणांगण जिंकणार
Covid 19 Vaccine
बेड हवाय! एक फाेन फिरवा; युवक कॉंग्रेस येईल तुमच्या मदतीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com