esakal | धमकावून वडापाव नेणा-या गजा मारणेला रात्रीत पोलिसांनी हलविले

बोलून बातमी शोधा

धमकावून वडापाव नेणा-या गजा मारणेला रात्रीत पोलिसांनी हलविले

खून केल्याच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणारा पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याची सात वर्षांनंतर सुटका झाली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी मारणे याची मोठी रॅली काढली होती.

धमकावून वडापाव नेणा-या गजा मारणेला रात्रीत पोलिसांनी हलविले
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या सातारा पोलिसांनी जावळी तालुक्‍यातील मेढा परिसरातून शनिवारी मुसक्‍या आवळल्या. कायदेशिर प्रक्रियेनंतर शनिवारी रात्रीच सहायक पाेलिस निरीक्षक अमाेल माने यांनी पुणे ग्रामीण पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एपीआय देवकर यांच्या ताब्यात दिले. 

फरारी असणारा गजा मारणे हा साथीदारांसमवेत मेढा भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार त्यांनी मेढा चौकात तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान पोलिसांनी (एम एच 12 क्यू वाय 2167) हे वाहन अडवले. त्यात चार व्यक्ती हाेत्या. या लाेकांची चाैकशी करीत असताना त्यामधील एक व्यक्ती मारणे या सारखी दिसत हाेती. त्याचा पेहराव टी-शर्ट आणि हाफ चड्डी असा हाेता. पाेलिसांनी मारणे यास ताब्यात घेतला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

खून केल्याच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणारा पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याची सात वर्षांनंतर सुटका झाली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी मारणे याची मोठी रॅली काढली होती. या रॅलीबाबत प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मारणे विरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यात मारणे याने पोलिसांना अंधारात ठेऊन पुणे जिल्हा न्यायालयातून जामीन मिळवला होता. जामीन मिळाल्यापासून मारणे हा गायब झाला होता. याच काळात दुकानावर येऊन वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या जबरदस्तीने नेल्याची फिर्याद एका विक्रेत्याने पुणे पोलिसांकडे नोंदवली होती. हा गुन्हा दाखल झाल्यापासून मारणे हा फरारी होता.

कानून के हाथ बहुत लंबे होते है! पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला साताऱ्यात अटक

फरार गजा मारणे कोर्टात आला, जामीन घेऊन गेला; पोलिसांना माहितीच नाही

शनिवारी मेढा पाेलिसांनी त्याच्यासह सुनील बनसाेडे, संताेष शेलार, सचिन घाेलप या तिघांना ताब्यात घेण्यात आले. वैदयकीय तपासणीनंतर चारही आराेपींना पुणे ग्रामीण पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एपीआय देवकर यांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती सहायक पाेलिस निरिक्षक अमाेल माने यांनी ई-सकाळला दिली.

गुंड गज्या मारणेवर यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याने त्याच्या स्थानबद्धतेचा (एमपीडीए) प्रस्ताव जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठवला हाेता. त्यास मंजूरी मिळताच आमचे पाेलिस दल सक्रिय झाले. फरार आराेपीस पकडण्यात सातारा पाेलिसांची आम्हांला मदत झाली. 

डाॅ. अभिनव देशमुख , पाेलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण