पुसेगाव : तडफडणा-या भारद्वाजला पक्षिमित्रांनी दिले जीवदान

पुसेगाव : तडफडणा-या भारद्वाजला पक्षिमित्रांनी दिले जीवदान

पुसेगाव (जि. सातारा) : निढळ (ता. खटाव) येथील रस्त्याच्याकडेला तडफडणाऱ्या भारद्वाज पक्ष्यावर उमेश सावंत व त्यांच्या मित्रांनी उपचार करून जीवदान देऊन सोडून दिले. या घटनेचे निढळ परिसरात कौतुक होत आहे. सोमवारी (ता. 30) ठोंबरेवाडी-निढळ येथे दहिवडी- पुसेगाव रस्त्याने उमेश सावंत हे आपल्या चारचाकी वाहनाने आपल्या दुकानात चालले असताना रस्त्याच्या कडेला भारद्वाज पक्षी तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

त्यांनी लगेचच आपली गाडी थांबवून त्या पक्ष्याला आपल्याजवळ घेतले. त्या पक्ष्याला पाणी पाजून, चारा घालून त्याच्यावर उपचार करण्यात आले. भारद्वाज पक्ष्याला तरतरीपणा आल्यानंतर व बरे वाटू लागल्यानंतर पुन्हा त्यास सुरक्षित ठिकाणी नेऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे सोडण्यात आले.

चांगला पाऊस, पोषक वातावरणाचा 'माण'च्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा; कृषी विभाग 

पक्ष्यावर उपचार करण्यासाठी श्री. सावंत यांना सागर पवार, संग्राम निर्मळ, अजित माने, प्रतीक सावंत, नाना भिसे, घनवट शेठ व अन्य पक्षिमित्रांनी मदत केली. या घटनेचे निढळ परिसरात सर्वत्र कोतुक होत आहे.

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com