esakal | गांधीजी के देशमें मोदीशाही नहीं चलेगी; वडूजात केंद्राचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

National Congress Party

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढण्याचा राज्यभर कार्यक्रम हाती घेतला आहे.

गांधीजी के देशमें मोदीशाही नहीं चलेगी; वडूजात केंद्राचा निषेध

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : इंधन व गॅस दरवाढीच्या (Petrol Diesel Price Hike) निषेधार्थ आज येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या (National congress party) वतीने सायकल रॅली (Bicycle rally) काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. येथील हुतात्मा स्मारकापासून रॅलीला शुभारंभ करण्यात आला. मुख्य बाजारपेठ, बाजार चौक, कऱ्हाड-दहिवडी रस्ता, बस स्थानक मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. इंधन दरवाढ त्वरित मागे घ्या, गॅस सिलींडरच्या किंमती कमी करा, गांधीजी के देशमें मोदीशाही नहीं चलेगी, भाजपा हटाव देश बचाव आदी घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. (Cycle Rally Of Congress Party Against Petrol And Diesel Price Hike In Vaduj bam92)

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, पंचायत समितीचे माजी सदस्य भरत जाधव, माजी सरपंच अर्जुन गोडसे, संजीव साळुंखे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, माजी उपसरपंच परेश जाधव, डॉ. संतोष गोडसे, डॉ. महेश माने, ॲड. संतोष भोसले, शंकर माळी, अनिल कचरे, दाऊदखान मुल्ला, इम्रान बागवान, राजेंद्र खाडे, सचिन घाडगे आदी रॅलीत सहभागी झाले होते.

हेही वाचा: प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी वरिष्ठांनी इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढण्याचा राज्यभर कार्यक्रम हाती घेतला आहे. विविध आश्वासने देऊन व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आपली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत. उलट पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलींडरच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. या दरवाढीमुळे व वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर होरपळ होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात असलेल्या इंधन व गॅसच्या किंमती आज केंद्रातील भाजपाशासीत सरकारच्या काळात गगनाला भिडल्या आहेत. इंधन व गॅस दरवाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचेच काम केले आहे, ही बाब निषेधार्ह आहे. यावेळी नायब तहसीलदार विलासराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. डॉ. गुरव यांनी आभार मानले.

Cycle Rally Of Congress Party Against Petrol And Diesel Price Hike In Vaduj bam92

loading image