दानवलीत रानगव्यांकडून स्ट्रॉबेरीचे नुकसान; बळीराजा संकटात

दानवलीत रानगव्यांकडून स्ट्रॉबेरीचे नुकसान; बळीराजा संकटात

भिलार (जि. सातारा) : दानवली (ता. महाबळेश्वर) परिसरात रानगवे व इतर वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला असून काल (ता. 6) रात्री बाळू बाबू धनावडे यांच्या शेतात रानगव्यांच्या कळपाने ऐन तोडणीस आलेल्या स्ट्रॉबेरी फळाचे, तसेच रोपांचे अतोनात नुकसान केल्याची घटना घडली. 

सध्या कोरोना आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी आतबट्ट्यात आला असताना या वन्यप्राण्यांच्या संकटाने शेतकरीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. सध्या गतवेळच्या हंगाम कोरोना संकटाने आर्थिक विवंचनेत गेला. बाजारपेठेअभावी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतातच कुजवून टाकली. या संकटाने स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. यावर्षी शेतकऱ्यांनी लागवडीत कपात केली. पण, रानटी प्राण्यांच्या या अस्मानी संकटाने या शेतकऱ्यांवर आता कर्ज काढून घातलेले पैसे आता मिळतील की नाही, याची खात्री नाही. बाळू बाबू धनावडे यांच्या एक एकरावरील स्ट्रॉबेरीचे वन्य प्राण्यांना केलेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे.

सध्या स्ट्रॉबेरी फळांची तोडणी होणार होती. त्यातच या रानगव्यांनी घातलेल्या उच्छादामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात वन्यप्राणी रात्रीच्या वेळी उभी पिके फस्त करीत असून रानगव्यांचे कळप या पिकांमध्ये रात्रीच्या वेळी उच्छाद घालताना दिसत आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com