Heavy Rain : केळघरात पाण्याच्या निचऱ्याने स्ट्रॉबेरी, भातशेतीचे मोठे नुकसान

Rain
Rainesakal

केळघर (सातारा) : पावसामुळे (Rain) येथील ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ होत असून पर्यायी रस्ता खचल्यामुळे पाण्याचा निचरा नदीपात्रात होत नसल्याने ओढ्याच्या दोन्ही काठावरील स्ट्रॉबेरी शेती (Strawberry) व भातशेती धोक्‍यात आली आहे. अचानक आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या पाण्याने (Rain Water) मामुर्डी येथील पर्यायी रस्ता वाहून गेल्याची घटना घडली होती. (Damage To Strawberry And Paddy Fields Due To Rain Water At Kelghar Satara Agro News)

Summary

पाण्याचा निचरा नदीपात्रात होत नसल्याने ओढ्याच्या दोन्ही काठावरील स्ट्रॉबेरी शेती व भातशेती धोक्‍यात आली आहे.

त्याच्या दुसऱ्या दिवशीच संबंधित ठेकेदारास केळघर येथील पुलाजवळील पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी (Farmers) कल्पना दिली होती. रस्ता खचून पाणी साठण्याचीही कल्पना दिली होती. तरीही येथे कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पर्यायी रस्त्याच्या पूर्वेकडील माती ढासळून पाणी निचरा होणारी संरक्षक मोरी गाडली गेली आहे. तर पश्‍चिमेकडील मोरीच्या तोंडावर ओढ्याच्या पाण्यातील गाळ अडकल्यामुळे ओढापात्रात पाणीसाठा वाढला आहे.

Rain
ठाकरे- मोदींच्या भेटीवर उदयनराजे म्हणतात...
Rain Water
Rain Water

या ओढ्याला धारदेव, गाढवली, वारणे वस्ती, कुरुळोशी, खिलार मुरा या गावांच्या शिवारातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी एकत्रित होते. त्यातून पूर येतो. या मोरीची तातडीने दुरुस्ती केली नाही, तर दोन्ही काठांवरील स्ट्रॉबेरीसाठी तयार केलेली शेती व भातशेती पाण्याखाली जाणार आहे. पूर्वकल्पना देऊनही संबंधित ठेकेदार डोळेझाक करत असेल आणि त्यातून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असा संतप्त सवाल येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Damage To Strawberry And Paddy Fields Due To Rain Water At Kelghar Satara Agro News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com