..तर झिरपवाडी रुग्णालयासाठी तीव्र आंदोलन करु; फुलेंचा सरकारला इशारा

दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांच्यासाठी शहरातील वैद्यकीय सेवा सुविधा पुरेशा नाहीत.
Hospital
Hospitalesakal

फलटण शहर (सातारा) : फलटण शहर व तालुक्‍यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढताना रुग्णांना वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झिरपवाडी हद्दीतील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची (Zirapwadi Rural Hospital) इमारत तातडीने दुरुस्त करावी. तिचा वापर कोरोना उपचार केंद्रासाठी करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले (Dashrath Phule) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (Dashrath Phule Warns Government To Agitate For Zirapwadi Hospital Satara News)

फलटण-गिरवी रस्त्यावर झिरपवाडी ग्रामपंचायत हद्दीत 30 ते 35 वर्षांपूर्वी 8 एकर जागेत लाखो रुपये खर्च करून रूग्णालय उभारण्यात आले होते. त्या वेळी सुसज्ज इमारत, आवश्‍यक वैद्यकीय साधने, सुविधा आणि पुरेसा अधिकारी, कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला असूनही रुग्णालय प्रत्यक्ष सुरू झाले नाही. 1997 मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्‍झांडर फलटणला आले असता दशरथ फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन रुग्णालय सुरू करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. मात्र, ते पूर्ण क्षमतेने कधीही सुरू झाले नाही आणि अखेर बंद करण्यात आले.

Hospital
माणसाच्या नरडीचा घोट घेणारा 'देवमाणूस'!

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर हे रुग्णालय सुरू करावे म्हणून पुन्हा मागणी केली. त्या वेळी झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत भागीदारी तत्त्वावर संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय झाला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते; परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांच्या साठी शहरातील वैद्यकीय सेवा सुविधा पुरेशा नाहीत. इमारतीसाठी केलेले आराखडे, अंदाजपत्रक तातडीने मंजूर करून कोरोना उपचार केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.

शिबेवाडीत घराची पडझड; मंद्रुळकोळ्यात पंपगृहावर झाड कोसळले

Dashrath Phule Warns Government To Agitate For Zirapwadi Hospital Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com