esakal | पहाटेच्या सुखद गारव्यात रसिकांनी घेतला ऑनलाइन गाण्यांचा आस्वाद
sakal

बोलून बातमी शोधा

पहाटेच्या सुखद गारव्यात रसिकांनी घेतला ऑनलाइन गाण्यांचा आस्वाद

जाहीर कार्यक्रम करण्यास निर्बंध असल्याने यंदा कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांना घेता यावा, यासाठी ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था केले होती. 

पहाटेच्या सुखद गारव्यात रसिकांनी घेतला ऑनलाइन गाण्यांचा आस्वाद

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : पहाटेचा सुखद गारवा, चंद्राचा मंद प्रकाशात दिवाळीच्या सुगंधीत वातावरणाला सुरांचे कोंदण देत रंगणारे दिवाळी पहाट कार्यक्रम यावर्षी जाहीरपणे झालेच नाहीत. मात्र, तरीही उत्साही संगीतप्रेमींनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा ऑनलाइन आस्वाद घेतला.
 
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दर वर्षी दिवाळी पहाट हा गीत संगीताचा कार्यक्रम आयोजिला जातो. यावर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमाचे पतसंस्थेच्या मुख्य शाखेत ऑनलाइन आयोजन केले होते. त्यामध्ये शशिकांत धनावडे प्रस्तूत "गीत गाता चल' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गणदेवता गजानन आणि रसिकांना वंदन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ कलाकारांनी केला. शशिकांत धनावडे यांनी सादर केलेल्या "तुज मागतो मी आता' या गीताने सुरू झालेला कार्यक्रम शेवटपर्यंत प्रवाही झाला, तसेच दीपाली मनाये सुहानी या श्‍यामला काकडे यांच्या गीतांने कार्यक्रमात रंग भरण्यास सुरवात केली. 

पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते 

सुधीर मुळे आणि श्‍यामला काकडे यांचे "शुक्रतारा मंदवारा...' हे गीत तर दिवाळीच्या पहाटेच्या सुखद गारव्यातही बहरून गेले. संजय क्षीरसागर यांनी "पुकारता चला हू मै...' अशी गीतातून रसिकांना साद घातली. त्यानंतर "मोगरा फुलला...' आणि बुगडी माझी सांडली गं... या लावणीला सोशल डिस्टन्सिंग राखत उपस्थित असलेल्या रसिकांनी भरभरून दाद दिली. श्रीमती काकडे यांचे आली माझ्या घरी दिवाळी हे गीत सादर करून रसिकांचा वाहवा मिळविली.
 
जाहीर कार्यक्रम करण्यास निर्बंध असल्याने या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांना घेता यावा, यासाठी ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था केले होती. प्रारंभी पतसंस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. व्यवस्थापक विनायक भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास रवींद्र कळसकर, सुनील बंबाडे, अभिनंदन मोरे आणि रसिक उपस्थित होते.

साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर

Edited By : Siddharth Latkar

loading image