सोशल मीडियावरुन महिलांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा

Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorheesakal

सातारा : राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये महिला दक्षता समितीची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात यावी, तसेच महिला अत्याचारांवरील संरक्षण कायद्यांची सर्व माहिती पोलिस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला अवगत करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी केल्या. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing Meeting) झालेल्या महिला दक्षता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe Ordered To Police Officers To Take Action Against Who Comment On Womens On Social Media)

Summary

महिला अत्याचारांवरील संरक्षण कायद्यांची सर्व माहिती पोलिस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला अवगत करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केल्या.

Summary

बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai), विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजवर्धन सिन्हा (Special Inspector General of Police Rajvardhan Sinha), पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह अकोला, रायगड, चंद्रपूर, अहमदनगर, बुलढाणा, बीड व सोलापूर ग्रामीण येथील पोलिस अधीक्षक उपस्थित होते. उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लॉकडाउनमुळे महिला अत्याचारांवरील पाठपुरावा न झालेल्या केसेसचा प्राधान्याने तपास करुन गुन्हे नोंद करावेत. स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत कार्यपध्दती निश्चित करावी. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांच्या केसेसला प्राधान्य द्यावे. दर महिन्याला दक्षता समितीची बैठक घेऊन महिला दक्षता समितीमार्फत काय करायचं याबाबत पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे.

Dr. Neelam Gorhe
सातारा जिल्हा 'अनलॉक'; सर्व दुकानं वेळेच्या मर्यादेत राहणार सुरु!

प्रत्येक शासकीय कार्यालयातील होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींवर उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत कार्यवाही करावी. सोशल मीडियावरुन स्त्रियांच्याबाबतीत नकारात्मक टीका-टिप्पणीवर त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मंत्री देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याही अत्याचारीत महिलेने निनावी पत्राद्वारे तक्रार केल्यास त्यावर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून त्वरित कार्यवाही करण्यात यावी. स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत मंत्रालयस्तरावर पोलिस महासंचालक, अतिरीक्त मुख्य सचिव (गृह) व संबंधित सर्व पोलिस महानिरीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन नवीन कार्यपध्दती आखण्यात येईल. ती लवकरच कार्यान्वीत करुन आरोपींना लवकरात-लवकर शिक्षा करणे, अशा प्रकारचे गुन्हे घडणारच नाही अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतील असेही ते म्हाणाले.

Deputy Chairman Dr. Neelam Gorhe Ordered To Police Officers To Take Action Against Who Comment On Womens On Social Media

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com