Satara : खंडाळ्यात कृषी पदवी कॉलेजला मंजुरी

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये खंडाळा येथे कृषी पदविकेपर्यंत शिक्षण घेण्याची सोय आहे.
satara
satarasakal

वाई - कृषी पदवीसाठी परिसरातील विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागू नये, यासाठी खंडाळा येथे कृषी पदवी अभ्यासक्रम, वाई ते महाबळेश्वर वीज वाहक तारा भूमिगत करणे आदी कामांसोबत वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांतील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये खंडाळा येथे कृषी पदविकेपर्यंत शिक्षण घेण्याची सोय आहे. त्याच शिक्षण संकुलात कृषी पदवी अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे.

satara
Mumbai : त्याचे ९० टक्के शरीर काम करत नाही, इच्छाशक्तीच्या जोरावर बारावीत यशाला गवसणी

त्याचसोबत महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटन स्थळे डोंगरी भागात वसलेली असून, सदर ठिकाणचा विद्युतपुरवठा वाईच्या उपकेंद्रातून होतो. हा वीजपुरवठा पावसाळ्यात खांब पडून वारंवार खंडित होतो. त्यामुळे वाई ते महाबळेश्वर वीज वाहक तारा भूमिगत करण्याची मागणी केली असून, त्यास तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

वाई येथील वीज उपविभागीय केंद्रावर ९० हजारांहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. हा भार कमी होण्यासाठी भुईंज येथे आणखी वीज उपविभागीय केंद्र उभारण्याची मागणी केली असून, त्यास मान्यता मिळाली आहे. हिंदकेसरी, अर्जुन पुरस्कार विजेत्यांसह विविध क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, या मागणीची दखल घेऊन त्याबाबत संबंधितांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.

satara
Pune : बोपोडीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; ६३ घरांवर पुणे महापालिकेकडून कारवाई

याचसोबत विशेष रस्ते दुरुस्ती योजनेतून सुमारे ३१ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मान्यता मिळाली असून, त्यामध्ये पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, वाठार, भाडळे, बुध, राजापूर, दहिवडी रस्ता, किसन वीर महाविद्यालय ते पाचवड फाटा रस्ता, पारगाव, यवत, सासवड, कापूरहोळ, भोर, मांढरदेव, खानापूर ते जोशी विहीर ते शिरगाव रस्ता, भुईंज-शिवथर, बलकवडी फाटा, उळुंब, जोर, धनगरवाडा, कात्रटवस्ती रस्ता, जाधववस्ती राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते बोपेगाव पांडे, ओझर्डे, सोनेश्वर, कडेगाव, व्याजवाडी, वाघजाईवाडी,

satara
Mumbai : एमआयडीसी जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहनांची वाहतूक

म्हातेकरवाडी, बावधन रस्ता, बावधन फाटा ते घरटाणा रस्ता, ओझर्डे, मालदरा, अनवडी, शिरगाव, भोसलेवस्ती, देगाव, किकली, निकमवाडी, जांब, चांदवडी रस्ता, पाचगणी, कुडाळ, उडतारे, खडकी, चांदवडी, जांब, किकली, म्हापारवाडी, लगडवाडी, किकली ते लगडवाडी रस्ता, ओहळी, पाकिरेवस्ती, रायरेश्वर, घेराकेंजळ,

खावली रस्ता, वाई, परखंदी, मुंगसेवाडी, चांदक, वेळे, सोळशी रस्ता आदी ३१ कोटींच्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांना मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले असून, ही कामे लवकरात लवकर सुरू होतील, असा विश्वास मदन भोसले यांनी या पत्रकात व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com