'जय श्रीराम'च्या जयघोषात अन्नदानाचं वाटप; कोविड सेंटर ठरतंय गरीबांसाठी 'आधार'

Chaitanya Covid Center
Chaitanya Covid Centeresakal

गोंदवले (सातारा) : कोरोनामुळे (Coronavirus) भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी येथे ‘श्रीं'चा अन्नदानाचा वारसा मात्र मंदिर समितीकडून (Temple Committee) अखंडितपणे सुरूच आहे. चैतन्य कोविड सेंटरमध्ये (Chaitanya Covid Center) 'जय जय श्रीराम'च्या जयघोषाने मंगलमय वातावरणनिर्मिती होऊन कोरोनामुक्तीसाठीचा आलेख वाढत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना श्रीराम नामजपाबरोबर अन्नदान प्रिय होते. हाच अन्नदानाचा वारसा समाधी मंदिर समितीने अखंडितपणे सुरू ठेवला आहे. (Distribution Of Foodgrains To The Citizens At Chaitanya Covid Center At Gondwale Satara Marathi News)

Summary

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी समाधी मंदिर बंद आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी समाधी मंदिर बंद असूनही जिल्ह्यातील गरजूंना मोफत अन्नधान्य देऊन अन्नदानाची परंपरा जोपासली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका गोंदवल्यासह परिसरातील लोकांना बसला. यावर उपाययोजना करण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुढाकाराने मंदिर समितीसह विविध सामाजिक संस्था धावल्या. येथे कोविड रुग्णालयासह (Covid Hospital) विलगीकरण केंद्र (Quarantine Centre) सुरू करण्यात आल्यावर रुग्णांच्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी मंदिर समितीने घेतली आहे. येथे दाखल असणाऱ्या रुग्णांना नाश्ता, दोन वेळचे जेवण, गरम पाणी, आयुर्वेदिक काढादेखील दिला जात आहे. यासाठी काही दानशूरांकडूनही यथाशक्ती मदत होत आहे.

Chaitanya Covid Center
'तुम्हाला काय करायचं ते करा'; कोरोनाग्रस्त दांपत्याचं दहिवडीतून पलायन

कोविड रुग्णालय व विलगीकरणातील सुमारे सव्वाशेहून अधिक रुग्णांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. आचाऱ्यांसह इतर कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी योगदान देत आहेत. शिवाय गावातील तरुण वर्ग याकामी स्वयंस्‍फूर्तीने सहभागी होत आहेत. स्वयंपाक बनविण्यापासून रुग्णांपर्यंत पोचेपर्यंत ‘श्रीं'च्या समाधी मंदिराप्रमाणेच येथेही 'जय जय श्रीराम'चा जयघोष ऐकायला मिळत आहे. परिणामी ‘श्रीं'च्या समाधी मंदिरात असल्याचा अनुभव येथेही मिळत आहे. त्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण होत असून, सकारात्मक मानसिकतेमुळे रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे येथे पाहायला मिळत आहे.

Chaitanya Covid Center
जिल्हाधिकाऱ्यांचे धरणग्रस्तांकडे दुर्लक्ष; वर्षभरात कोयना टास्क फोर्सची बैठकच नाही!

कोरोनामुक्तीसाठी सुरू असलेल्या चैतन्य कोविड सेंटरमधील रुग्णांची भूक भागविण्याच्या कामातून खूप आत्मिक समाधान मिळत आहे.''

-पंकज पाटील व सचिन पाटोळे, गोंदवले बुद्रुक

Distribution Of Foodgrains To The Citizens At Chaitanya Covid Center At Gondwale Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com