‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचे दिमाखदार वितरण

‘सकाळ’च्यावतीने आदर्श माता आणि कर्तृत्ववान महिलांचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत साताऱ्यात रंगला सोहळा
Distribution of Idols of Maharashtra awards in satara
Distribution of Idols of Maharashtra awards in satara

सातारा - रंगबेरंगी दिव्यांच्या झोतांतून हळुवार होणारी प्रकाशाची पखरण, सुमधूर गीतसंगीताची साथ, व्यासपीठाची भव्यदिव्य सजावट अशा प्रसन्न आणि उल्हसित करणाऱ्या वातावरणात साताऱ्यात ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात झाला. येथील देविका लॉन्समध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत आपल्या कर्तृत्वाने आदर्श ठरलेल्या माता आणि समाजातील कर्तृत्वान महिलांचा तेवढ्याच ताकदीच्या कर्तृत्वान व्यक्तींच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब आणि मुला-मुलींना उन्नतीच्या एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या समाजातील प्रेरणादायी माता आणि उत्तुंग यश मिळविणाऱ्या महिलांच्या या गौरवाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. सकाळी ११ वाजता झालेल्या सन्मान मातृत्वाचा कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार या उपस्थित होत्या.

सायंकाळी सात वाजता रंगलेल्या सन्मान स्त्रीशक्तीच्‍या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शेखर सिंह, मिळून साऱ्याजणीच्या संपादिका गिताली वि. मं., अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर उपस्थित होते. प्रा. निरंजन फरांदे यांच्या ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालनाने दोन्ही कार्यक्रमांना रंगत आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com