esakal | शरद पवारांशी पाऊण तासाच्या चर्चेनंतर उदयसिंह पडले बाहेर

बोलून बातमी शोधा

शरद पवारांशी पाऊण तासाच्या चर्चेनंतर उदयसिंह पडले बाहेर

अविनाश मोहिते यांच्या गटासोबत राहण्यासाठीची व्यूहरचना यामध्ये आखली जाणार आहे, तसेच जिल्हा बॅंकेतही स्थान मिळण्याचेही संकेत असल्याने नव्या राजकीय वळणाला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. 

शरद पवारांशी पाऊण तासाच्या चर्चेनंतर उदयसिंह पडले बाहेर

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतर जिल्हा बॅंकेसह व कृष्णा कारखान्याची पहिली निवडणूक होत आहे. त्यानुसार ऍड. उदयसिंह पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत गाठीभेटही घेतल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात कृष्णा व जिल्हा बॅंकेत ऍड. उदयसिंह पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कृष्णा कारखान्यासह जिल्हा बॅंकेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाची नेमकी काय भूमिका राहणार याचीच उत्सुकता लागली असतानाच ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी काही मोजक्‍या नेत्यांना सोबत घेऊन मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. कृष्णा कारखान्यासह जिल्ह बॅंकेच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांत सुमारे पाऊणतास खोलीबंद चर्चा झाली. त्यामुळे कृष्णा कारखान्यात ऍड. उदयसिंह पाटील व अविनाश मोहिते यांच्यातील एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे.
 
कृष्णा सहकरी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच होत आहे. त्या अनुषंगाने कॉंग्रेस व राष्ट्रवादीने कृष्णा कारखाना लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना दोन्ही कॉंग्रेसच्या निशाण्यावर आहे. कऱ्हाडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्‍यांत कृष्णाचे कार्यक्षेत्र आहे. त्या तालुक्‍यातील राजकारणावर कारखान्याचा प्रभाव आहे. कृष्णा कारखान्याचा सातारा, सांगली जिल्ह्यांतील 132 गावांतील कार्यक्षेत्रात दोन्ही पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या ताकदीवर कृष्णा कारखाना पुन्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आला पाहिजे, यासाठी दोन्ही पक्षातील नेते सक्रिय झाले आहेत.

काेण काेणते अधिका-यांची नावे आमदारांनी घेतली, काय म्हणणे आहे त्यांचे वाचा सविस्तर

कृष्णा कारखाना व जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उंडाळकर गटाची ताकद पुन्हा सक्रिय झाली आहे. उंडाळकर गटाशी पृथ्वीराज चव्हाण गटाचा सलोखा झाला आहे. त्यामुळे दक्षिणेत कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. त्याचा कारखाना निवडणुकीत कसा फायदा करून घेता येईल, यासाठी राष्ट्रवादीने अविनाश मोहिते यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णासह जिल्हा बॅंकेत नेमकी काय भूमिका घ्यायची. राष्ट्रवादीची साथ मिळणार का, यासाठी ऍड. उंडाळकर व त्यांच्या काही नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ऍड. उंडाळकर यांनी मुंबईत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत या दोन्ही निवडणुकांबाबत श्री. पवार यांच्याशी खोली बंद चर्चा झाली. अविनाश मोहिते यांच्या गटासोबत राहण्यासाठीची व्यूहरचना यामध्ये आखली जाणार आहे, तसेच जिल्हा बॅंकेतही स्थान मिळण्याचेही संकेत असल्याने नव्या राजकीय वळणाला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. 


उदयसिंहांची भूमिका महत्त्वाची 

ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतर जिल्हा बॅंकेसह व कृष्णा कारखान्याची पहिली निवडणूक होत आहे. त्यानुसार ऍड. उदयसिंह पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत गाठीभेटही घेतल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात कृष्णा व जिल्हा बॅंकेत ऍड. उदयसिंह पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

'अधिकारी मतदारसंघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत'; सेनेचे आमदार अधिवेशनात आक्रमक 

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; दहा जण पोलिसांच्या ताब्यात

अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीची बाजी; जांभुळणी पंचायतीच्या सरपंचपदी स्वाती काळेल

ऊसतोड मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टरला मिनीबसची जोरदार धडक; बीडसह कर्नाटकातील 18 जण जखमी

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुंबई अव्वल; सांगली उपविजेती, कोल्हापूर तिसऱ्या क्रमांवर

Edited By : Siddharth Latkar