शेतकऱ्यास फेसबुक मैत्रिणींनी 40 लाखांना गंडविले; सात अटकेत

शेतकऱ्यास फेसबुक मैत्रिणींनी 40 लाखांना गंडविले; सात अटकेत

सातारा : साताऱ्यातील शेतकऱ्यास अमेरीकन सैन्यात असल्याचे भासवून एका परदेशी महिलेने लाखो रुपयांना गंडा घातला आहे. मी अमेरीकन सैन्यात मोठ्या पदावर आहे आणि आपल्याला भारतात मोठी आर्थिक गुंतवणूक करायची आहे, असं सांगून संबंधित महिलेने फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मुंबईतील डाेंगरी पाेलिसांनी प्रकरणाचा छडा लावून सात जणांना अटक केली आहे.

मर्सि ग्रेस आणि साताऱ्यातील शेतकऱ्याची ओळख फेसबुकवर झाली. बघता बघता त्यांची घट्ट मैत्री झाली. मर्सि ही सध्या अफगाणिस्तान येथे कार्यरत असून आपल्याकडे खूप पैसे आहेत. त्यापैकी 10 लाख डॉलर्सची भारतात गुंतवणूक करायची आहे. त्याकरता तुझी मदत हवी आहे, असं मर्सिने शेतकऱ्याला सांगितले होते. पण मर्सिचा हा सगळा बनाव होता. तिनं गोड गोड बोलून त्या शेतकऱ्याला तिच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला तब्बल 40 लाख रुपयांना गंडा घातला. 

मर्सि शेतकऱ्याच्या संपर्कात गेल्या अनेक दिवसांपासून होती. व्हॉट्सअॅपवर देखील त्यांचे बोलणे सतत सुरू होते. अचानक एक दिवशी शेतकऱ्याला मर्सिच्या मॅनेजरचा फोन आला आणि मर्सिने तुम्हाला 10 लाख डॉलर पाठवले आहेत, असं सांगितलं. इथेच सुरू झाली शेतकऱ्याच्या फसवणुकीची मालिका.

या कामासाठी त्या अमेरिकन महिलेला सात जणांनी मदत केली होती. या सातही आरोपींच्या मुसक्या दिल्ली येथून डोंगरी पोलिसांनी आवळल्या आहेत. नीरज रमेश वर्मा, साबीर सिंकदर, मन माेहन सिंग, चंद्रपाल नेत्रम शर्मा, आसिफ शमशुद्दीन शेख, वसीम अहमद खान आणि जेम्स अॅमाआेबी आेबेबुलाम अशी सात जणांची नावे आहेत. या सात पैकी वसीम हा उत्तर प्रदेश व अन्य सहा जण दिल्ली येथील आहेत. या टाेळीविरुद्ध मुंबईसह देशातील विविध राज्यांत सुमारे 30 गुन्हे दाखल असल्याचे तपास
अधिकारी प्रकाश लिंगे यांनी नमूद केले. 

असे काय झाले आहे क-हाड पालिकेत नागरिकांवरच आली तिजाेरीची जबाबदारी 

प्रकाश नारायण जाधव हे साता-यातील असून शेतीसह ते एक व्यावसायिक म्हणून सुपरिचित आहेत. सध्या ते कुटुंबियांसमवेत डाेंगरी भागात वास्तव्यास आहेत. त्यांची फेसबुकच्या माध्यमातून फेब्रुवारीत मर्सी ग्रेस या महिलेशी आेळख झाली. या दाेघांमध्ये संवाद वाढला त्यातूनच तिने जाधव यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. एकदा शाॅपिंग माॅलसाठी तिने त्यांच्याकडून लाखाे रुपये घेतले. विशेष म्हणजे ही रक्कम वेगवेळ्या बॅंक खात्यातून जमा करण्यात आली हाेती. मात्र त्यानंतर तिने जाधव यांच्याशी बाेलणे कमी केले.

काही दिवसांनंतर तिचा माेबाईल बंद येऊ लागल्याने जाधव यांना आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात आले. त्यांनी डाेंगरी पाेलिसांत धाव घेतली. त्यानंतर पाेलिसांनी फसवणुकीसह आयटी कायद्यातंर्गत गुन्हा नाेंदविला. दरम्यान एसीपी अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पाेलिस संदीप भागडीकर यांच्या पथकातील प्रकाश लिंगे, द्वारका पाेटवडे, भरत कदम, अमित करपाते, याेगेश गाढवे, ताैसिक शेख, मुकेश साेनावणे, दगडू तडवी यांनी तपास केला. या पथकाने दिल्ली पाेलिसांच्या मदतीने एका विदेशी नागरिकासह सात जणांना जेरबंद केले. सध्या या संशयित आराेपींना पाेलिस काेठडीत रवाना करण्यात आले आहे.

रॉकिंग गर्ल अनू; इन्स्टाग्रामवर बदनामीप्रकरणी एकावर गुन्हा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com