Satara : हरित लवादाची नोटीस येताच शिवेंद्रराजेंचा स्पष्ट इशारा; म्हणाले, कास पठारावरील बांधकामाला..

कास परिसरातील (Kas Pathar) व्यावसायिकांवर हरित लवादाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
kas pathar Shivendraraje Bhosale
kas pathar Shivendraraje Bhosaleesakal
Summary

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ०.५ एफएसआयपर्यंतची बांधकामे कायम करण्याचा निर्णय झाला होता. त्याची कारवाई लवकर व्हावी.

सातारा : कोणत्याही परिस्थितीत कास परिसरातील स्थानिकांच्या बांधकामाला आम्ही हात लावू देणार नाही. कारण येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळाल्या तरच पर्यटक येणार आहेत, हे समाजसेवकांनी समजून घ्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब हरित लवादासमोर मांडावी, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

कास परिसरातील व्यावसायिकांना हरित लवादाच्या नोटिसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या व्यावसायिकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या (Shivendraraje Bhosale) नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. त्या वेळी व्यावसायिकांच्या वतीने निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

kas pathar Shivendraraje Bhosale
Koyna Dam : कोयनेत फक्त 18 TMC पाणी; कर्नाटकला देणार तरी किती, शिंदे सरकार होणार मेहरबान?

यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘कास परिसरातील (Kas Pathar) व्यावसायिकांवर हरित लवादाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यावरून या व्यावसायिकांना नोटिशी आल्या आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो. मागे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ०.५ एफएसआयपर्यंतची बांधकामे कायम करण्याचा निर्णय झाला होता. त्याची कारवाई लवकर व्हावी, अशी मागणी आम्ही केली.

kas pathar Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale : प्रतापगड प्राधिकरण अध्यक्षपदी खासदार उदयनराजे; रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा

शासनाचे धोरणात ही ०.५ एफएसआयमध्ये बसून जातील, तसेच प्रशासनाने व्यावसायिकांची बाजू हरित लवादापुढे मांडावी. पर्यटक येतात म्हणून या स्थानिकांनी व्यवसाय सुरू केला आहे. बांधकामे पाडायचा विषय नाही. स्थानिकांच्या बांधकामाला आम्ही हात लावून देणार नाही. ही शासकीय जागा नसून स्वमालकीची जागा आहे. या परिसरात लोक फिरायला येतात, पर्यटकांना सुविधा मिळायला हव्यात. हे समाजसेवकांनी समजून घ्यावे.’’ जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब हरित लवादापुढे मांडावी, अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com