अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा डॉ. जाधवांनी स्वीकारला पदभार

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा डॉ. जाधवांनी स्वीकारला पदभार

सातारा : जिल्हा रुग्णालयासाठी महत्त्वाच्या असलेल्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा डॉ. रामचंद्र जाधव यांनी पदभार स्वीकारला आहे. डॉ. जाधव हे भूलतज्ज्ञ आहेत. जून 2011 मध्ये जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून सेवेत रुजू झाले होते. त्यांच्या देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयामध्ये आजवर हजारो यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. 

आजवरच्या कालावधीमध्ये त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालयाचा, तसेच ग्रामीण रुग्णालयांचेही कामकाज पाहिले होते. त्याचबरोबर यापूर्वीही त्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. या कालावधी त्यांचे जिल्हा रुग्णालयाचे कामकाज व रुग्णांना मिळणारी सुविधा योग्य पद्धतीने राहील यावर कटाक्ष ठेवला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी आता पुन्हा त्यांच्याकडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा जिल्हा रुग्णालयाच्या एकंदर व्यवस्थापनात नक्कीच लाभ होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com