esakal | Video पाहा : द्रविड हायस्कूलच्या पेन्सिलच्या प्रतिकृतीची हाेतेय चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Video पाहा : द्रविड हायस्कूलच्या पेन्सिलच्या प्रतिकृतीची हाेतेय चर्चा

पेन्सिलची ही प्रतिकृती शाळेच्या आवारात शोभून दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना, तसेच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही, असे श्री. मोने यांनी सांगितले.

Video पाहा : द्रविड हायस्कूलच्या पेन्सिलच्या प्रतिकृतीची हाेतेय चर्चा

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील द्रविड हायस्कूलच्या आवारात वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही पेन्सिल सध्या सर्वांचेच आकर्षण ठरली आहे.
 
वठलेल्या झाडातूनही टाकाऊतून टिकाऊ काही तरी निर्माण होऊ शकते, अशी मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या डोक्‍यातून भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरली. त्यांनी शाळेत सुतारकाम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील राजेश सुतार या कारागिराला हे झाड दाखवले. श्री. मोने यांनी त्यांची कल्पना त्यांना बोलून दाखवली. त्या कारागिराला ही कल्पना आवडली व त्यांनी या झाडाच्या बुंध्यापासून पेन्सिल करून देतो, असे सांगितले. त्यानी झाडाचा बुंधा रांधून पेन्सिलप्रमाणे झाडाची प्रतिकृती तयार केली. नंतर त्याला आकर्षक रंगभरण केल्याने उठावदार पेन्सिल प्रतिकृती तयार झाली.

एका वठलेल्या झाडातून तिची सुंदर प्रतिकृती तयार होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही; परंतु द्रविड हायस्कूल नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबवित असते आणि त्यातूनच ही पेन्सिलची प्रतिकृती उदयास आली. पेन्सिलची ही प्रतिकृती शाळेच्या आवारात शोभून दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना, तसेच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही, असे श्री. मोने यांनी सांगितले.

अनाथ व मनोरुग्णांसाठी ‘यशोधन ट्रस्ट’ 

रस्त्यांची चाळण अन् टोल वाढ; पुणे- बंगळूर महामार्गाकडे लक्ष द्या, नेटीझन्सची गडकरींना मागणी 

काेण काेणत्या Hospital बराेबर प्रशासनाची चर्चा सुरु आहे वाचा सविस्तर

प्रशासन नुसतं हातावर हात ठेऊन बसलय? शंभूमहादेवाच्या भाविकांची भावना

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top