
या अॅपवर सध्या 30 लाखांपेक्षा जास्त ऑनलाईन स्टोअर आहेत. 50 लाखांपेक्षा जास्त उत्पादन आहेत. या सर्व उत्पादनांना जवळपास 40 व्यवसायांमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अॅपद्वारे दुकानदारांना आतापर्यंत जवळपास नऊ लाखांपेक्षा जास्त ऑर्डर दिल्याची नाेंद आहे.
सातारा : स्थानिक दुकानदारांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ मार्ट अॅपची स्थापना केली. परंतु, हे अॅप दुकानदारांना रुचले नाही. त्यामुळेच त्याचा अंबानींच्या अन्य उत्पादनाप्रमाणे फारसा गवगवा झाला नाही. अंबानींच्या अॅपला मात्र साता-यातील एका बहादराने टक्कर दिली आहे. त्याने तयार केलेले अॅप दुकानदारांना आपले वाटले. याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या अॅपचे नाव देखील असू शकते. साता-यातील एका युवकाने केलेल्या दुकान अॅपला (Dukaan App) लाॅकडाऊनपासूनच माेठा प्रतिसाद मिळाला आहे.
आॅनलाईन वस्तु खरेदी करण्यासाठी युवा पिढी कायम अग्रेसर असते. त्यासाठी वेगवेगळे संकेतस्थळ, अॅपची विकसीत हाेत आहेत. त्यातून एखाद्या अॅपला युवा वर्ग पसंती देतात आणि खरेदी विक्रीची व्यवहार सुरु हाेतात. हे आेळखून उद्याेगपती मुकेश अंबानी यांनी जिओ मार्ट हे अॅप बाजारात आणले. अवघ्या दिवसांत त्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याची चर्चा सुरु झाली. ऑर्डर दिली तर वस्तूंची डिलिव्हरी होत नाही किंवा परस्पर ऑर्डर रद्द होते. त्यामुळे अनेकांनी जिओ मार्ट अॅपकडे पाठ फिरवल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जिओ मार्टला लाेकांनी सपशेल नाकारले.
काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लाॅकडाऊन झाल्याने व्यवसाय ठप्प हाेऊ लागले. परिणामी अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले. लोकांच्या घराबाहेर हालचालींवर बंधने आणली गेली. मोठ्या प्रमाणावर कामकाज किंवा ग्राहकांच्या अभावामुळे छाेट्या छाेट्या दुकानदारांना त्यांच्या व्यवसायाची काळजी वाटू लागली. ही काळजी दूर करण्यासाठी साता-यातील सुमित शहा याच्या दुकान अॅपची मदत झाली. सुमितने सुरु केलेले दुकान अॅप बाजारात अवघ्या काही दिवसांतच दुकानदारांसह ग्राहकांच्या गळातील ताईत बनले. सुमित हा मूळचा साता-यातील असला तरी त्याने काही दिवसच येथे आपल्या नातेवाईकांच्या दुकानात काम केल्याचे सांगतिले जाते. त्यानंतर ताे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी बंगळूर येथे स्थायिक झाल्याची माहिती उपलब्ध हाेत आहे.
दुकान अॅपने लहान आणि मध्यमवर्गीय उद्योगपतींचा व्यवसाय वाढण्यासाठी उचललं त्याचे महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे. या अॅपच्या माध्यमातून दुकानदारांचे प्रश्न आणि समस्या समजू लागले. लोकांना तांत्रिकदृष्ट्या कशाप्रकारे सोप्य सुविधा देता येईल, याकडे त्याने पाहिलं. त्यामुळेच दुकानदारांची आणि ग्राहकांची दुकान अॅपला पसंती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
हे अॅप विकसीत झाल्याने अवघ्या तीन महिन्यात एक लाख लाेकांनी त्याचा लाभ घेतला. आता सहा महिन्यानंतर तब्बल 4.3 मिलियन लोकांनी म्हणजेच जवळपास 43 लाख लोकांनी या अॅपला आपल्या माेबाईलमध्ये स्थान दिले आहे. या अॅपने स्थानिक स्तरावरील दुकानदारांना डिजीटल युगाबाबत प्रशिक्षण दिलं आहे. या अॅपच्या माध्यमातून मोबाईलच्या मदतीने दुकानदार आपल्या वस्तू सोशल मीडियावर शेअर करुन व्यवसाय करु शकतो.
Woohoo! In just 3 months we've helped more than 1 Million Businesses go online with @mydukaanapp
Cheers to the 1 million Dukaandars and our badass team who always believed in the vision of making India go DIGITAL #DigitalIndia #Dukaan pic.twitter.com/HIpkW1r4Yu
— Suumit Shah (@suumitshah) September 14, 2020
अॅपचा वापर कसा करायचा?
या अॅपचा वापर करण्यासाठी सर्वात आधी हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर दुकानदाराने आपला व्यवसाय नोंद करावा. या प्रकियेला 30 सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. या अॅपवर प्रत्येक दुकानदाराला एक कस्टमर स्टोअर लिंक मिळते, या लिंकवर दुकानदार आपल्या सर्व वस्तूंविषयी माहिती देऊ शकतात. स्टोअरची लिंक दुकानदार व्हाट्स अॅप किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईट्सवर शेअर करुन व्यवसाय करु शकतात. या अॅपचा उपयोग हा छोट्या दुकानदारांपासून मोठमोठ्या हाॅटेल, रेस्टॉरंट, सराफाच्या दुकानांसाठी होऊ शकतो. इथे दुकानदार छाेट्या छाेट्या वस्तुंपासून अगदी फळं, भाज्या, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही विक्री करु शकतात.
राज्यात आला भाकरीसह चुलीवरच्या जेवणाचा ट्रेंड, आता पंजाबी किंवा पाश्चात्त्य पद्धतीचं जेवण विसरा
या अॅपवर सध्या 30 लाखांपेक्षा जास्त ऑनलाईन स्टोअर आहेत. 50 लाखांपेक्षा जास्त उत्पादन आहेत. या सर्व उत्पादनांना जवळपास 40 व्यवसायांमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अॅपद्वारे दुकानदारांना आतापर्यंत जवळपास नऊ लाखांपेक्षा जास्त ऑर्डर दिल्याची नाेंद आहे.