जिल्ह्यात ई- वाहनांची तपासणी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

E-vehical

जिल्ह्यात ई- वाहनांची तपासणी मोहीम

सातारा - जिल्ह्यातील वाहन उत्पादक ई- वाहनांमध्ये अनधिकृतपणे बदल करून विक्री करतानाचे प्रकार उघड झाले आहेत. हे प्रकार सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे वाहन विक्री करणाऱ्या उत्पादकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.

पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ पासून लागू केले. त्यासाठी ई वाहनांना वाहन करातून १०० टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये २५० वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या आणि ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा वाहनांचा समावेश आहे. अशा प्रकारे वाहन उत्पादन करणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहनाची चाचणी केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत मान्यताप्राप्त संस्थांकडून होणे अनिवार्य आहे.

या वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून २५० वॅटपेक्षा जादा क्षमतेची बॅटरी टाकून वेगमर्यादा वाढवत आहेत. वास्तविक अशा वाहनांना नोंदणी आवश्‍यक नसल्याने वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले जात आहेत. त्यामुळे ई वाहनांना आग लागून अपघात होण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्याने नागरिकांनी वाहन खरेदी करताना मान्यताप्राप्त मानांकनाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा करावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे.

Web Title: E Vehicle Inspection Campaign In Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraInsurancee-vehicle
go to top