'कोयना'ला भूकंपाचा धक्का; 18 दिवसांनंतर धरणक्षेत्र पुन्हा हादरला

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्याने हादरला आहे.
Earthquake
Earthquakeesakal

कोयनानगर : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (Koyna Dam) परिसर भूकंपाच्या (Earthquake) दोन सौम्य धक्क्याने हादरला आहे. शनिवारी दुपारी १.५५ ला कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या धक्क्याच्या लहरी संपत नाही, तोच ३ मिनिटांच्या अंतराने भूकंपाचा दूसरा सौम्य धक्का याच परिसरात बसला असून भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे, तर भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदूचे अंतर वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या वायव्येला ८.० किमी होते. (Earthquake In Koyna Dam Area Satara News)

8 मे रोजी दुपारी १.५५ ला कोयना परिसरात भूकंपाचा पहिला धक्का बसला आहे. भूकंप मापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. केवळ ३ मिनिटाच्या अंतराने हाच परिसर भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्याने हादरला आहे. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.० रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून गत महिन्यात २० एप्रिलला कोयना परिसर भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्याने हादरले होते. १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाच्या धक्क्याची खोली ८ किमी खोल होती.

Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार

Earthquake In Koyna Dam Area Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com