फलटणमध्ये घरातून आठ किलो गांजा जप्त; पतीसह पत्नीला अटक

शहरातील सोमवार पेठेत संशयित संजय रावबा गायकवाड व त्याची पत्नी पंचशीला गायकवाड
गांजा जप्त
गांजा जप्तsakal

फलटण शहर : शहरातील सोमवार पेठेतील घरात शहर पोलिसांनी छापा टाकून आठ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पतीसह पत्नीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील सोमवार पेठेत संशयित संजय रावबा गायकवाड व त्याची पत्नी पंचशीला गायकवाड हे दोघे त्यांच्या घरात गांजाची चोरून विक्री करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. त्यानुसार भारत किंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खात्री करून बुधवारी (ता. ८) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास गायकवाडच्या घरी छापा मारून झडती घेतली.

गांजा जप्त
साताऱ्यात रविवारी हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा; वाहतुकीत बदल

त्यावेळी पोलिसांना फर्निचरच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यात पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पोते सापडले. या पोत्यात खाकी रंगाची पाकिटे होती. त्यात गांजा ठेवण्यात आला होता. एकूण आठ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. संजय गायकवाड व पंचशीला गायकवाड या संशयितांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक भारत किंद्रे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com