नगरपंचायतींची निवडणूक जाहीर; जिल्ह्यात पुन्‍हा उडणार राजकीय धुरळा I Nagar Panchayat Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Election Commission

राज्‍यातील 105 नगरपंचायतींच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला.

नगरपंचायतींची निवडणूक जाहीर; जिल्ह्यात पुन्‍हा उडणार राजकीय धुरळा

सातारा : राज्‍यातील मुदत संपणाऱ्या १०५ नगरपंचायतींच्‍या निवडणुकीचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम आज राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामध्‍ये जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. जिल्‍हा बँक निवडणुकीच्‍या (Satara Bank Election) निमित्ताने सुरू झालेली रणधुमाळी शांत होत असतानाच नगरपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्‍याने पुन्‍हा राजकीय धुरळा उडण्‍यास सुरुवात होणार आहे.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेतल्यामुळं 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान झालं नाही'

राज्‍य निवडणूक आयोगाने (State Election Commission) एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्‍या ८१, डिसेंबर २०२१ मध्‍ये मुदत संपणाऱ्या १८ आणि नव्‍याने निर्माण झालेल्‍या ६ अशा १०५ नगरपंचायतींच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्‍ये लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी या नगरपंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतींच्‍या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्‍हा एकदा ढवळून निघणार आहे. नगरपंचायतीत असणारी सत्ता अबाधित राखण्‍यासाठी तसेच सत्तेबाहेर असणारे सत्तेत जाण्‍यासाठीचे सर्व प्रयत्‍न आगामी काळात करणार असल्‍याने जिल्ह्यातील राजकारण पुन्‍हा एकदा गतिमान होणार आहे.

हेही वाचा: अमल महाडिक शंभर टक्के निवडून येणार : धनंजय महाडिक

...असा आहे कार्यक्रम

  • मतदार यादी प्रसिद्ध करणे : २९ नोव्‍हेंबर

  • निवडणूक कार्यक्रम जाहीर : ३० नोव्‍हेंबर

  • ऑनलाइन अर्ज भरणे : १ डिसेंबर सकाळी ११ ते ७ डिसेंबर दुपारी २ पर्यंत ( शासकीय सुटी वगळता)

  • छाननी व वैध अर्जांची यादी प्रसिध्‍दी : ८ डिसेंबर

  • अर्ज माघारी : १३ डिसेंबरच्‍या दुपारी ३ पर्यंत

  • अपील दाखल व सुनावणी : १६ डिसेंबर

  • चिन्‍ह वाटप : १४ डिसेंबर

  • मतदान : २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत

  • मतमोजणी : २२ रोजी सकाळी १० पासून.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

loading image
go to top