सहा नगरपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; निवडणूक आयोगाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Election Commission

मतदार यादीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

सहा नगरपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्या- त्या ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat) वॉर्डनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केला. त्यानुसार ३० नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यातील लोणंद, वडूज, दहिवडी, खंडाळा, कोरेगाव व पाटण नगरपंचायतींची आरक्षण सोडत नुकतीच पार पडली होती. त्या पाटण वगळता अन्य नगरपंचायतींचे आरक्षण चुकल्याने ते त्याच दिवशी रद्द ठरवत निवडणूक आयोगाने सोमवारी त्यांचे फेरआरक्षण घेतले. त्यातील वॉर्ड रचनेची अंतिम मंजुरी मंगळवार (ता. २३) अखेर आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा असणारा नगरपंचायतींच्या वॉर्डनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे.

हेही वाचा: दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'

त्या निवडणुकांसाठी एक नोव्हेंबर २०२१ ची यादी गृहीत धरली जाणार आहे. त्या नगरपंचायतींची वॉर्डनिहाय प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. २३ ते २६ नोव्हेंबरअखेर त्या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. २९ नोव्हेंबर रोजी वॉर्डनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. ३० नोव्हेंबरला मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

हेही वाचा: UP Election : अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका

loading image
go to top