सह्याद्रीच्या डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना शेततळे द्या; पाटण तालुक्यातील 'या' नेत्याची मागणी

सह्याद्रीच्या डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना शेततळे द्या; पाटण तालुक्यातील 'या' नेत्याची मागणी

पाटण (जि.सातारा)  कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली शहरांबरोबर आसपासच्या गावांचा महापुरातील धोका टाळण्यासाठी व ऑगस्ट, सप्टेंबरमधील महापूर टाळण्यासाठी राज्य शासनाने सह्याद्रीच्या डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे द्यावे. त्यासोबत लघुपाटबंधारे प्रकल्प राबवावे, अशी मागणी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केली आहे. येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बापरे! कास पठार परिसरात घाेंगावताेय काेराेना  

पश्‍चिम घाटातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शासनाच्या खर्चाने शेततळे दिले, तर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठविले जाऊ शकते, असे स्पष्ट करून श्री. पाटणकर म्हणाले, ""पाटण तालुक्‍याचा विचार करून हा प्रकल्प राबविल्यास हजारो एकर शेती बागायतीखाली येईल. पाणी उपलब्ध झाले, की पडीक शेतीत बागायती पिके होतील व मुंबई-पुणे शहरात जाणारा स्थानिक तरुण गावातच आपले करिअर निर्माण करेल. डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी शेततळी व लघुपाटबंधाऱ्यात साठविले, तर अतिवृष्टीत निर्माण होणारा महापुराचा धोका टळू शकतो. शासनाने ही योजना चळवळ म्हणून राबविली, तर 25 ते 30 टीएमसी पाणी पश्‍चिम घाटाच्या डोंगर उतारावर साठविले जाऊ शकते. हे पाणी पुन्हा विजेचा वापर न करता सायपन पद्धतीने शेतीला देऊन विजेची बचत होईल.''
सातारा जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; 16 रुग्ण कोरोनामुक्त

Video : सातारा तालुक्यासह शहरात वाढू लागले काेराेनाबाधित
 
डोंगर उतारावरील लहरी मॉन्सूनवरील खरीप शेती सोडली, तर पुन्हा ही शेती पडून असते. शेततळी झाली, तर पाणी साठविले जाईल. त्या पाण्यातून डोंगर उतार शेतीसह वृक्षलागवडीखाली येतील आणि महापुराचा होणारा धोका टाळण्यासाठी आता जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटातील डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा निर्णय अमलात आणणे गरजेचे आहे, असे पाटणकर यांनी स्पष्ट केले.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

ऑनलाईन पद्धतीने निधी न काढल्याने 28 कोटी गेले परत 


'या' प्रसिद्ध धबधब्यावर पोलिस बंदोबस्ताची आवश्‍यकता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com